हातकणंगले मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार तात्काळ जाहीर करावा अशी मागणी इंडिया आघाडीच्या वतीने नुकताच करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे कोल्हापूर तसेच सांगली लोकसभा मतदारसंघात विकास आघाडीचे उमेदवार जाहीर करण्यात आले तसाच एखादा चांगला उमेदवार हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून देखील महाविकास आघाडीने तात्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे.
याचबरोबर महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करून त्याला निवडून आणू. उमेदवार कोण आहे याबद्दल आम्हाला काहीच अडचण नाही आमचा उद्देश फक्त महायुतीला पराभूत करणे हाच असेल असाही निर्धार यावेळी इंडिया आघाडीच्या बैठकीत करण्यात आला.
यावेळी इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.