मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्यानेही कुत्र्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर कुत्रा मनसोक्त मैदानात फिरत होता. अखेर ग्राउंड स्टाफने कुत्र्याला पकडून मैदानाबाहेर नेले आणि खेळ पुन्हा सुरू होऊ शकला. पण हा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
इंडियन प्रीमियर लीगचा 17वा हंगाम सुरू झाला आहे. सामन्यांमध्ये रंगत सुरु झाली आहे. आयपीएलच्या सुरुवातीपासून उत्कृष्ट कामगिरी दिसू लागली आहे. परंतु काही किस्सेही चर्चेत येत आहेत. राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात स्पायडर कॅमेऱ्याची वायर तुटली, त्यामुळे सामना बराच वेळ थांबला होता. त्यानंतर रविवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात जे घडले त्याचा व्हिडिओ चांगला व्हायरल झाला आहे. या सामन्यात एका कुत्र्याची एन्ट्री झाली.
कुत्र्याने प्रेक्षकांना हसवले
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी गुजरात आणि मुंबई यांच्यात सामना होता. या आयपीएल हंगामातील हा पाचवा आणि या स्टेडियममधील पहिला सामना होता. या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या घातक गोलंदाजीने गुजरातची फलंदाजी उद्ध्वस्त केली. त्यानंतर मुंबईला विजय मिळवता आला नाही. परंतु या सामन्यात एका कुत्र्याने कमाल केली. त्याने प्रेक्षकांना हसवले.
सामन्यात काय घडले
गुजरातच्या डावाच्या 15व्या षटकात हा प्रकार घडला. मुंबई संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या गोलंदाजीसाठी आला होता. त्याने पहिला चेंडू टाकला. त्यानंतरत खेळ अचानक थांबला आणि स्टेडियममध्ये मोठा हास्याचा आवाज झाला. कारण होते एक भटका कुत्रा. स्टेडियमची सर्व व्यवस्था आणि सुरक्षेला चकवा देत हा कुत्रा मैदानात घुसला. तो कुत्रा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पळू लागला. कुत्रा जिकडे धावत गेला तिकडे प्रेक्षकांचा आवाज मोठा झाला आणि चाहते आनंदी झाले.
पंड्या याने केला प्रयत्न
मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्यानेही कुत्र्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर कुत्रा मनसोक्त मैदानात फिरत होता. अखेर ग्राउंड स्टाफने कुत्र्याला पकडून मैदानाबाहेर नेले आणि खेळ पुन्हा सुरू होऊ शकला. पण हा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. युजर्सने त्याचा खूप आनंद घेतल आहेत आणि कॉमेंट व्यक्त करत आहेत. काही युजर्सने हा प्रकार दुर्मिळ असल्याचे म्हटले आहे.
गुजरात टायटन्स प्लेईंग इलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (डब्ल्यू), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, आर साई किशोर आणि स्पेन्सर जॉन्सन.
मुंबई इंडियन्स प्लेईंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड