मार्च महिना संपत आलेला आहे. आणि आपले हे या वर्षाच्या आर्थिक वर्ष देखील संपणार आहे. परंतु आता एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच पैशाच्या संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. त्यामुळे याची माहिती तुमच्यापर्यंत मिळणे खूप गरजेचे आहे. तुम्ही जर या गोष्टींची माहिती करून घेतली नाही तर तुमचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.
यामध्ये आता नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये लॉगिन करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होणार आहे. त्याचप्रमाणे sbi क्रेडिट कार्डमध्ये देखील बदल होणार आहे. त्याचे कोणते नियम लागणार आहेत हे आपण पाहणार आहोत.एनपीएस खात्यात लॉगिन करण्यासाठी दोन घटक पडताळणी करावी लागेल
पेन्शन फंड रेग्युलेटर आणि डेव्हलपमेंट ॲथॉरिटीने एमपीएससी अधिकाऱ्यांना फायबर फसवणुकीपासून वाचवण्यासाठी त्यांच्या लॉगिन प्रणालीमध्ये अनेक बदल केलेले आहे. त्यामुळे खात्यात लॉगिन करण्यासाठी तुमच्याकडे आयडिया आणि पासवर्ड तसेच आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर खूप गरजेचा आहे. 1 एप्रिल पासून हे नवीन नियम लागू होणार आहे.
SBI क्रेडिट कार्ड नियमांमध्ये होणार बदल
आता एसबीआयचे क्रेडीट कार्ड धारकांसाठी ही बातमी आहे. ती म्हणजे आता 1 एप्रिल पासून भाडे भरल्यावर देखील रीवार्ड पॉइंट्स आता बंद होणार आहे
येस बँकेच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल | Financial Rules
येस बँकेने त्यांच्या क्रेडिट कार्डधारकांना नवीन वर्षात निर्णय घेतलेला आहे. या ग्राहकांना चालू आर्थिक वर्षाच्या एका तीमाहित दहा हजार रुपये खर्च करून देशांतर्गत विमानतळ लॉजिंगमध्ये प्रवेश मोफत मिळेल. हे नियम १ एप्रिल पासून होणार आहे.
ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे
ICICI बँक आपल्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्येही बदल करणार आहे. 1 एप्रिल 2024 पासून, ग्राहकांनी एका तिमाहीत रु. 35,000 पेक्षा जास्त खर्च केल्यास त्यांना एअरपोर्ट लाउंजमध्ये मोफत प्रवेश मिळेल.
OLA मनी वॉलेटच्या नियमांमध्ये बदल
OLA मनी 1 एप्रिल 2024 पासून त्याचे वॉलेट नियम बदलणार आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना एसएमएस पाठवून कळवले आहे की ते स्मॉल पीपीआय (प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट) वॉलेट सेवेची मर्यादा 10,000 रुपयांपर्यंत वाढवणार आहे.