देशात सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे. अशात आता होळीमुळे सोमवार, 25 मार्च रोजी भारतीय शेअर बाजार(stock market news) व्यवहारासाठी बंद राहणार आहे. सोमवारी होळीची तर शुक्रवारी म्हणजेच 29 मार्च रोजी गुड फ्रायडेची सुट्टी असल्याने येत्या आठवड्यात शेअर बाजर केवळ तीन दिवस सुरू राहिल.
सोमवारी, देशातील सर्वात मोठा बिगर कृषी(stock market news) कमोडिटी बाजार, मल्टि कमोडिटी एक्सचेंज (MCX) सकाळच्या सत्रात सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत बंद राहील. मात्र, सायंकाळच्या सत्रात सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत ते पुन्हा सुरू होईल. या दिवशी ॲग्रो कमोडिटी इंडेक्समध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत. याशिवाय शुक्रवारी एमसीएक्स आणि एनसीडीईएक्स या दोन्ही ठिकाणी व्यवहार बंद राहणार आहेत.
BSE हॉलिडे कॅलेंडरनुसार, 2024 मध्ये भारतीय शेअर बाजारला तब्बल 14 सुट्ट्या आहेत. यापूर्वी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन आणि ८ मार्चला शिवरात्रीनिमित्त शेअर बाजार बंद होता. शेअर बाजार एप्रिलमध्ये दोनदा, मे, जून, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये प्रत्येकी एकदा आणि नोव्हेंबरमध्ये दोनदा बंद असणार आहे. दिवाळी (लक्ष्मीपूजन) शुक्रवार, 1 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे.
त्यामुळे एक्सचेंजेसद्वारे मुहूर्त ट्रेडिंग आयोजित केले जाईल. या मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळा, नंतर कळवल्या जाणार आहेत.2024 च्या शेअर बाजाराच्या सुट्टीच्या वेळापत्रकानुसार, गुड फ्रायडे ही मार्चची शेवटची सुट्टी आहे. एप्रिल 2024 मध्ये शेअर बाजारात 11 एप्रिल आणि 17 एप्रिलला दोन सुट्ट्या असतील. 11 एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजार ईद-उल-फित्र (रमजान ईद) साठी बंद राहणार आहे. तर राम नवमी सणानिमित्त 17 एप्रिल रोजी NSE आणि BSE बंद राहतील.