Sunday, December 22, 2024
Homeराशी-भविष्य३१ मार्चपासून मालव्य राजयोग बनल्याने ‘या’ राही कमावतील प्रेम, पैसे व प्रतिष्ठा;...

३१ मार्चपासून मालव्य राजयोग बनल्याने ‘या’ राही कमावतील प्रेम, पैसे व प्रतिष्ठा; धनलक्ष्मीच्या आवडत्या राशी कोणत्या पाहा?

ग्रहांची चाल बदलताच त्याचा प्रभाव संपूर्ण मानवी जीवनावर कमी- अधिक व शुभ- अशुभ स्वरूपात होत असतो. प्रत्येक ग्रह हा आपापल्या गतीनुसार स्थान बदलत असतो. वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार आता मार्च महिन्याच्या शेवटी म्हणजेच ३१ मार्च २०२४ ला शुक्र ग्रह कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र हा धन, वैभव, भौतिक सुख, प्रेम व ऐश्वर्याचा कारक मानला जातो.

जेव्हा हा शक्तिशाली शुक्र ग्रह मीन राशीत येईल तेव्हा त्याच्या प्रवेशासह मालव्य राजयोग निर्माण होणार आहे. ३१ मार्चला तयार झालेला मालव्य योग शुक्राचे पुढील राशी परिवर्तन होईपर्यंत कायम असेल. या कालावधीत तीन अशा राशी आहेत ज्या या योगामुळे धन- धान्य व आरोग्यासह समृद्धी अनुभवणार आहेत.आर्थिक व मानसिक तसेच शारीरिक दृष्टीने सुद्धा हा कालावधी श्रेष्ठ ठरेल, अशा या नशीबवान तीन राशी कोणत्या हे पाहूया..

 

शुक्राचा मालव्य राजयोग ‘या’ तीन राशींना देणार प्रेम, पैसे व प्रतिष्ठा

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

मीन राशीत शुक्राचे गोचर झाल्यावर तयार होणारा मालव्य राजयोग हा मिथुन राशींच्या मंडळींसाठी शुभ मानला जात आहे. ३१ मार्चनंतर या राशींचे अच्छे दिन सुरु होण्याची शक्यता आहे. कामामध्ये येणारे अडथळे आपोआपच दूर होऊ लागतील. आर्थिक मिळकतीचे नवनवीन स्रोत आपल्याला लाभू शकतात. व्यावसायिकांसाठी हा कालावधी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. नवीन व महत्त्वाचे संपर्क प्रस्थापित होतील ज्यामुळे तुमच्या कामाला गती मिळू शकते. स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या पदरी यश पडण्याचे संकेत आहेत. मेहनतीचे प्रलंबित फळ सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकते. आर्थिक लाभासाठी तुमचे संपर्कच कामी येणार आहेत.

 

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

कन्या राशीच्या लोकांना सुद्धा शुक्राचे गोचर लाभदायक असणार आहे. नोकरदार मंडळींना प्रमोशनचा योग आहे. पदोन्नत्तीसह पगारवाढ सुद्धा होऊ शकते. कामाचे कौतुक ऐकल्याने समाधानी असाल. वरिष्ठांची शाबासकी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादा पुरस्कार सुद्धा मिळू शकतो ज्यामुळे समाजातील मान- सन्मान वाढीस लागेल. मालव्य राजयोग आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लावेल. तसेच आपण जुन्या आजारांवर सुद्धा मात करू शकता. बाहेर खाणे टाळावे, पोटाच्या समस्या काही प्रमाणात त्रासदायक ठरू शकतात.

धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)

धनु राशीच्या व्यक्तींसाठी मालव्य राजयोग फायदेशीर ठरणार आहे. या कालावधीत आपण नव्या संपत्तीचे मालक होऊ शकता. सरकारी कामांमध्ये वेग अनुभवता येईल. कौटुंबिक प्रेम व एकोपा वाढेल. वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या समस्या दूर करण्यास प्रेमळ शुक्र मदत करू शकतो. ज्यामुळे जोडीदारासह नाते आणखी भक्कम होईल. लहान- सहान गोष्टी मनाला लावून घेणे टाळावे. विनम्रता सोडू नये. आरोग्याला प्राधान्य द्या. शुक्राच्या गोचरासह एखादी वाहन व प्रॉपर्टीच्या खरेदीची संधी चालून येऊ शकते. गुंतवणुकीवर भर द्या.

 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -