सध्या भारतात आयपीएलचे(f1 schedule) सामने खेळले जात आहेत. लीगच्या १७ व्या मोसमात आतापर्यंत ५ सामने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएलचा अंतिम सामना कधी होणार याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलीय. दरम्यान देशात यंदा लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत,यामुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते.हे १७ दिवसांचे वेळापत्रक होतं. यात ४ डबल हेडर सामन्यासह एकूण २१ सामने होणार आहेत.
Cricbuzz च्या अहवालानुसार IPL २०२४ चा पहिला क्वालिफायर(f1 schedule) सामना २१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. तर या हंगामातील एलिमिनेटर सामना २२ मे रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. दुसरा क्वालिफायर सामना २४ मे रोजी चेन्नई येथे होणार आहे. तर अंतिम सामना २६ मे रोजी चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर होणार आहे. तब्बल १२ वर्षांनंतर चेपॉकमध्ये आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. यापूर्वी २०१२ मध्ये चेन्नईत आयपीएलची फायनल झाली होती.
क्वालिफायर सामना १ – अहमदाबाद, २१ मे
एलिमिनेटर – अहमदाबाद, २२ मे
क्वालिफायर सामना २ – चेन्नई, २४ मे.
अंतिम सामना – चेन्नई, २६ मे
आयपीएलचा दुसरा टप्पा ८ एप्रिलपासून सुरू होणार आहे. निवडणुकीच्या तारखा डोळ्यासमोर ठेवून पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक आधी जाहीर करण्यात आले. आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. देशात १९ एप्रिल ते १ जून दरम्यान ७ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. दुसरा टप्पा ८ एप्रिलपासून सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. हा सामना चेपॉक येथे संध्याकाळी साडेसात वाजता होईल.
रिपोर्टनुसार पंजाब किंग्सचे काही सामने धरमशाला येथे खेळवले जातील. पंजाब किंग्सचा सामना ५ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि ९ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. राजस्थान रॉयल्सचे २ सामने गुवाहाटी येथे होणार आहेत. १५ मे रोजी राजस्थानचा सामना पंजाब किंग्सशी होईल. तर १९ मे रोजी कोलकाता नाइट रायडर्सचा गुवाहाटीशी सामना होईल.





