IPL 2024 मध्ये सोमवारी RCB ने पंजाब किंग्स विरुद्ध दमदार विजय मिळवला. त्यानंतर विराट कोहलीने टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुमबद्दल एक खुलासा केला. विराटने राहुल द्रविड यांच्याबद्दल ही गोष्ट सांगितली. सध्या राहुल द्रविड टीम इंडियाचे हेड कोच आहेत. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील राहुल द्रविड यांच्या संदर्भातील ही गोष्ट आहे. RCB च्या विजयानंतर विराट कोहलीने हा उल्लेख केला. पण प्रश्न हा आहे की, विराटला हा खुलासा का करावा लागला?. विराट कोहलीने कालच्या सामन्यात कसं प्रदर्शन केलं? ते सुद्धा एकदा जाणून घेऊया.
विराट कोहली ओपनिंगला आला. RCB साठी त्याने 49 चेंडूत 77 धावा केल्या. यात 11 फोर आणि 2 सिक्स आहेत. पंजाब किंग्सच्या 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट ही इनिंग खेळला. या दमदार इनिंगशिवाय 2 कॅच पकडल्या म्हणून विराटला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. विराटला इनिंगच्या पहिल्याच ओव्हरमध्ये जीवनदान मिळालं. त्याचा पुरेपूर फायदा त्याने उचलला. टीमला विजय मिळवून देणारी इनिंग तो खेळला.
मागे वळून बघता तेव्हा फक्त….
पंजाब किंग्सवर RCB च्या विजयानंतर विराट कोहली चिन्नास्वामी स्टेडियमवर फॅन्ससोबत आपल्या लव स्टोरीबद्दल बोलला. जेव्हा तुम्ही खेळता, तेव्हा लोक नंबर, आकडे या बद्दल अनेक गोष्टी बोलतात. पण जेव्हा तुम्ही मागे वळून बघता तेव्हा फक्त आठवणी असतात. विराट कोहलीने यावर राहुल द्रविड यांचं उदहारण दिलं.
राहुल द्रविडबद्दल काय म्हणाला?
विराट कोहलीने सांगितलं की, “राहुल द्रविड टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये या बद्दलच बोलतात. जेव्हा तुम्ही मैदानावर खेळता, तेव्हा मनापासून खेळा. कारण एकदिवस हे क्षण तुम्ही मिस करणार. जे प्रेम आणि सपोर्ट मला मिळालं, तो कमालीचा अनुभव होता”
विराटच RCB सोबत असच नातं
IPL मध्ये विराट कोहलीच RCB सोबत असत नात आहे. सलग 17 वर्ष विराट एकाच फ्रेंचायजीकडून खेळतोय. विराट कोहलीच्या 77 रन्सच्या इनिंगमुळे RCB ला IPL 2024 मध्ये पहिला विजय मिळाला. सर्वाधिक धावांसाठी दिली जाणारी ऑरेंज कॅप विराट कोहलीच्या डोक्यावर आहे.