Sunday, September 8, 2024
Homeक्रीडाकोलकात्याने होमग्राउंडचा ट्रेंड काढला मोडीत, आरसीबीचा घरच्या मैदानावर केला पराभव

कोलकात्याने होमग्राउंडचा ट्रेंड काढला मोडीत, आरसीबीचा घरच्या मैदानावर केला पराभव

आयपीएल 2024 स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून सुरु असलेला होमग्राउंडवरील विजयाचं गणित अखेर मोडीत निघालं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा घरच्या मैदानावर पराभूत केलं. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना 182 धावा केल्या आणि विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान कोलकाता नाईट रायडर्सने 3 गडी गमवून पूर्ण केलं.

कोलकाता नाईट रायडर्सचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. तर रॉयल चॅलेंजर्सला बंगळुरुच्या वाटेला एका विजयानंतर पुन्हा पराभव आहे. चेन्नई सुपर किंग्सने बंगळुरुला पहिल्या सामन्यात पराभूत केलं होतं. त्यानंतर पंजाबला पराभूत बंगळुरु विजयाच्या ट्रॅकवर आली होती. मात्र आता पुन्हा झालेल्या पराभवामुळे विजयाची ट्रॅकवरून उतरली आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पुढचा आणखी खडतर होणार आहे.कोलकात्याकडून फिलिप सॉल्ट आणि सुनिल नरीन ही जोडी मैदानात उतरली होती.

पॉवर प्लेच्या सामन्यात या दोघांनी आक्रमक सुरुवात करून दिली. या जोडीने 6.3 षटकात 83 धावांची भागीदारी केली. सुनील नरीनने 22 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 47 धावा केल्या. तर फिलिप सॉल्टने 20 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 30 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या वेंकटेश अय्यरनेही बंगळुरुच्या गोलंदाजांची धुलाई केली. वेंकटेश अय्यरने 29 चेंडूत 50 धावा केल्या. यात 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्याला श्रेयस अय्यरची साथ लाभली.

 

कोलकात्याचे विकेट्स झटपट बाद करण्यात बंगळुरुच्या गोलंदाजांना अपयश आलं. त्यामुळे विजयाचं स्वप्न दूरावलं आणि कोलकात्याचा विजय सोपा झाला. मयंक डागर आणि विजयकुमार विशाक वगळता एकही गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करता आली नाही. मोहम्मद सिराज आणि यश दयालही या सामन्यात फेल गेले. यश दयाल एक विकेट मिळाली. त्यानंतर यशचा सामना रिंकू सिंह याच्याशी झाला. पण तिथपर्यंत सामना कोलकात्याच्या बाजूने झुकलेला होता.दोन्ही संघांची प्लेइंग 11

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

 

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -