Thursday, April 25, 2024
Homeतंत्रज्ञानजिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; कंपनीने आणला सर्वात स्वस्त प्लॅन

जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; कंपनीने आणला सर्वात स्वस्त प्लॅन

सध्या देशामध्ये आयपीएल सुरू आहे. देशात असंख्य क्रिकेट चाहते आहेत. आयपीएलच्या हंगामात अनेक क्रिकेट रसिक आपल्या आवडत्या फ्रेंचायसीचा सामना पाहतात. सध्या डीजीटल जमाना आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएल हंगामात जिओनं एअरफायबरची (Jio Air Fiber Plus) धन धना धन ऑफर आणली आहे. यामुळे जिओ सिनेमा युजर्सला जिओ सिनेमावर मोफत स्ट्रिम करता येणार आहे.

 

Jio Air Fiber Plus धन धना धन.

जिओच्या नवीन एअरफायबर प्लस (Jio Air Fiber Plus) युजर्ससाठी नवीन धन धना धन ऑफरची घोषणा केली आहे. जुन्या आणि नवीन ग्राहकांना 60 दिवस तिप्पट इंटरनेट स्पीड मिळेल. Jio Air Fiber Plus इंटरनेट ऑफरमध्ये ग्राहकांच्या इंटरनेट सेवांचं स्पीड वाढवलं जात आहे. 16 मार्चपासून 2024 मध्ये 60 दिवस इंटनरनेट स्पीड नव्या आणि जुन्या ग्राहकांसाठी वैध असणार आहे.नवीन युजर्स Jio Air Fiber Plus कनेक्शन घेत आहेत, त्यांना रिचार्जनंतर वाढलेल्या स्पीडवर अपोआप अपग्रेड केलं जाईल. जुन्या युजर्सना स्पीड अपग्रेट संबंधीत जिओकडून एक ईमेल आणि एसएमएस मिळेल.

ही ऑफर त्या ग्राहकांसाठी असेल जे सहा महिने आणि बारा महिन्याच्या Jio Air Fiber Plus प्लॅन युजर्ससाठी आहे.Jio Air Fiber Plus युजर्ससाठी खास ऑफर आहेत. विशेष म्हणजे जिओ 5g सिमकार्डचा या ऑफरमध्ये समावेश नाही. तसेच ही ऑफर जिओ फायबर टू फायबरसाठी देखील उपलब्ध नाही. Jio Cinema सर्व आयपीएल 2024 च्या 4K रिजोल्यूशनमध्ये मोफतमध्ये स्ट्रीम करता येईल. युजर्सला 4K टीव्ही डिस्प्लेवर मॅच पाहता येणार आहे.जिओचा 49 रूपयांचा प्लॅन देतोय मजबूत ऑफर

जिओ नेहमी युजर्ससाठी नवनवीन ऑफर देत आहे. जिओ कंपनी नेहमी नवनवीन इंटरनेट पॅक लाँच करते. आता जिओनं 49 रूपयांचा प्लान लाँच केला आहे. यासाठी एका दिवसाची व्हॅलिडीटी मिळत आहे. एका दिवसाला तब्बल 25 GB इंटनरेट वापरता येणार आहे.

 

जिओनं 49 रूपयांचा प्लान लाँच केला आहे. त्या पॅकच्या माध्यमातून 25 GB इंटनरेट वापरता येणार आहे. तर आता त्यासह Jio Cinema अ‍ॅपवर IPL 2024 मॅच पाहता येणार आहे. हे सर्व जिओच्या 49 रूपयांमध्ये होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -