Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनरश्मिका मंदानासोबत डेटिंगच्या चर्चांदरम्यान लग्नाविषयी काय म्हणाला विजय?

रश्मिका मंदानासोबत डेटिंगच्या चर्चांदरम्यान लग्नाविषयी काय म्हणाला विजय?

 

अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही वर्षांपासून आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विजयने लग्नाविषयीचे त्याचे विचार मांडले. त्यावरून पुन्हा एकदा या दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत.

 

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून आहे. मात्र या दोघांनी वारंवार या चर्चा फेटाळल्या आहेत. आता पुन्हा एकदा रश्मिका आणि विजयच्या नात्याची चर्चा होऊ लागली आहे. यामागचं कारण म्हणजे आगामी ‘फॅमिली स्टार’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विजयने लग्नाविषयी त्याचे विचार व्यक्त केले. मला लग्न करायचं आहे आणि पिता बनायचं आहे, असं तो म्हणाला. तमिळनाडूमधील या कार्यक्रमात विजयला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.

 

इतक्यात लग्न करण्याचा विचार आहे का, असा प्रश्न विचारल्यावर विजय म्हणाला, “मलाही लग्न करायची इच्छा आहे आणि मला पिता व्हायचं आहे.” यावेळी विजयने लव्ह मॅरेज करणार असल्याचंही सांगितलं आहे. मात्र पार्टनरला आईवडिलांनी स्वीकार केला तरंच लव्ह मॅरेज करणार असल्याचं तो म्हणाला. विजय आणि रश्मिका यांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. या दोघांची जोडी चाहत्यांनाही खूप आवडते. मात्र दोघांनीही त्यांच्या नात्याची जाहीर कबुली अद्याप दिली नाही.

 

गीता गोविंदम’ या चित्रपटात एकत्र काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर दोघांनी ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटातही काम केलं. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये जेव्हा अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांनी हजेरी लावली होती, तेव्हा अनन्याने विजय आणि रश्मिकाच्या रिलेशनशिपबद्दल हिंट दिली होती. रश्मिकाचा याआधी साखरपुडा झाला होता, हे फार कमी लोकांना माहीत असेल. रश्मिकाने दाक्षिणात्य अभिनेता आणि निर्माता रक्षित शेट्टीशी साखरपुडा केला होता. मात्र 2017 मध्ये या दोघांचा साखरपुडा मोडला. यावर रश्मिकाने कधीच कोणती प्रतिक्रिया दिली नाही.

 

फेब्रुवारी महिन्यात रश्मिका आणि विजय साखरपुडा करणार असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र एका मुलाखतीत विजयने या चर्चा फेटाळल्या होत्या. “मी फेब्रुवारीमध्ये लग्न किंवा साखरपुडा करत नाहीये”, असं त्याने स्पष्ट केलं होतं. याविषयी तो पुढे म्हणाला होता, “मला आता असं वाटू लागलंय की पत्रकारांना दर दोन वर्षांनी माझं लग्न लावायचं असतं. प्रत्येक वर्षी मी या अफवा ऐकतो. ते फक्त माझ्या मागे लागले आहेत की कधी मी त्यांच्या तावडीत सापडतो आणि कधी माझं लग्न होतं.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -