Thursday, February 6, 2025
Homeक्रीडाआरसीबीला सर्वात लांब षटकार मारल्यानंतर वेंकटेश अय्यर थेट हॉस्पिटलमध्ये, काय झालं वाचा

आरसीबीला सर्वात लांब षटकार मारल्यानंतर वेंकटेश अय्यर थेट हॉस्पिटलमध्ये, काय झालं वाचा

 

आयपीएल स्पर्धेतील दहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगला. हा सामना कोलकात्याने 7 विकेट्स राखून जिंकला आणि स्पर्धेतील होमग्राउंडचा ट्रेंड मोडीत काढला. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना वेंकटेश अय्यरने 50 धावांची वादळी खेळी केली. मात्र त्यानंतर थेट रुग्णालय गाठवं लागलं.

 

 

आरसीबीला सर्वात लांब षटकार मारल्यानंतर वेंकटेश अय्यर थेट हॉस्पिटलमध्ये, काय झालं वाचा

आयपीएल स्पर्धेतील दहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगला. हा सामना कोलकात्याने 7 विकेट्स राखून जिंकला आणि स्पर्धेतील होमग्राउंडचा ट्रेंड मोडीत काढला. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना वेंकटेश अय्यरने 50 धावांची वादळी खेळी केली. मात्र त्यानंतर थेट रुग्णालय गाठवं लागलं.

 

आरसीबीला सर्वात लांब षटकार मारल्यानंतर वेंकटेश अय्यर थेट हॉस्पिटलमध्ये, काय झालं वाचा

वेंकटेश अय्यरने सामना संपल्यानंतर थेट गाठलं हॉस्पिटल, स्वत:च सांगितलं काय झालं ते..

आयपीएल स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होत आहे. कधी कोण वर, तर कधी खाली असं चित्र आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यानंतरही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. कोलकात्याने बंगळुरुला 7 विकेट्सने मात दिला आणि गुणतालिकेत थेट दुसरं स्थान गाठलं आहे. या सामन्यात वेंकटेश अय्यरची वादळी खेळी सर्वांच्या लक्षात राहण्यासारखी आहे. त्याने आपल्या खेळीत चार उत्तुंग षटकार ठोकले. मात्र या वादळी खेळीदरम्यान वेंकटेश अय्यरला पाठदुखीचा त्रास सुरु झाला. सामन्यानंतर वेंकटेश अय्यरने स्वत: याबाबतची माहिती दिली. स्कॅन करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं. वेंकटेश अय्यरने 30 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या.

 

मला स्कॅन करावं लागणार आहे. यासाठी मी थेट हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. खरं सांगायचं तरी खेळ पुढे घेऊन जाताना आधीच ट्रॅकवर आला होता. सुनिल नरीनने या सामन्यातील दबाव बऱ्यापैकी दूर केला होता. आम्हाला फक्त सामना संपवायचा होता. डावखुऱ्या स्पिनरसमोर मला मोठे शॉट्स खेळण्याची जबाबदारी घ्यायची होती. तसं करण्यात मी यशस्वी ठरलो. माझी होणारी पत्नी हा सामना पाहण्यासाठी आली होती आणि मला या डावाचं पूर्ण श्रेय तिला द्यायचं आहे.”, असं वेंकटेश अय्यरने सामना संपल्यानंतर सांगितलं.

 

दरम्यान , अर्धशतकी खेळी केल्यानंतर वेंकटेश अय्यरने होणाऱ्या पत्नीला फ्लाइंग किस दिला होता. दुसरीकडे, वेंकटेश अय्यरने स्पर्धेतील सर्वात उत्तुंग षटकार ठोकला आहे. नवव्या षटकातील चौथ्या चेंडूवर 106 मीटर लांब षटकार मारला. यापूर्वी हा विक्रम इशान किशनच्या नावावर होता. त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 102 मीटर लांब षटकार मारला होता. तर आयपीएल इतिहासात 2008 मध्ये सर्वात लांब षटकार चेन्नई सुपर किंग्सच्या एल्बी मोर्केलने मारला आहे. हा षटकार 124 मीटर लांब मारला होता. हा विक्रम 16 पर्व अबाधित आहे.

 

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

 

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -