Thursday, February 6, 2025
Homeमहाराष्ट्रदिल्लीत काय घडलं?, नाशिकचं काय होणार?; छगन भुजबळ यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट...

दिल्लीत काय घडलं?, नाशिकचं काय होणार?; छगन भुजबळ यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट काय?

 

गावबंदीच्या काळात पंकजा मुंडे गावात गेल्या. त्यांना अडवलं गेलं. त्या तर मराठा आरक्षणाच्या विरोधात काही बोलल्या नव्हत्या. भुजबळांना अडवणं समजू शकतो. पण पंकजा ताईंना का अडवलं? त्या वंजारी समाजाच्या आहेत म्हणून का? प्रणिती शिंदे तरी कधी आरक्षणावर बोलल्या का? मग वंजारी, दलित आणि माळी समाजाने उभं राहायंच नाही का? ते तरी सांगा, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.

 

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे नाशिकमधून लढणार असल्याची चिन्हे आहेत. नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट आणि राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. एवढेच नव्हेतर याबाबत छगन भुजबळ यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला माहिती नसताना नाशिकसाठी दिल्लीतूनच माझ्या नावाचा प्रस्ताव आला आहे, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे. तसेच तिकीट मिळालं तर आपण नाशिकमधून लढायला तयार असल्याचंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नाशिक मतदारसंघ कुणाकडे जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाशिकच्या जागेबाबतचे मोठे खुलासे केले. मी तिकीटासाठी आग्रही नव्हतो हे मी मागेही सांगितलंय. दिल्लीत जी चर्चा झाली, त्यात महाराष्ट्राबाबत माझ्या नावाची चर्चा झाली. या चर्चेत माझं नाव पुढे आले. माझं नाव लोकसभेसाठी पुढे येईल, याची मला कल्पनाही नव्हती. होळीसाठी निघालो होतो तेव्हा अर्ध्या वाट्यातून मुंबईला गेलो. वरिष्ठ पातळीवरून ठरलंय असं मला सांगितलं गेलं. मीही त्यांना मला एक दिवस द्या असं म्हटलं, असं छगन भुजबळ म्हणाले.

 

अन् नाशिकमध्ये चर्चा सुरू झाली

त्यानंतर मी अजित पवार यांच्याशी चर्चा केली. माझ्या नावाची चर्चा सुरू आहे हे खरं आहे का? असं त्यांना विचारलं. त्यावर, तुम्हाला उभं राहवं लागले. आम्ही चाचपणी केली, असं अजितदादा म्हणाले. उभं राहायचं असेल तर आधी तयारी करतात. पण ही गोष्ट बाहेर गेली आणि नाशिकमध्ये चर्चा रंगली, असं भुजबळांनी सांगितलं.

 

घड्याळावरच लढू

नाशिकमधून लढण्यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी आग्रह धरला आहे. पण महायुतीचे नेते जो निर्णय देतील तो मला मान्य आहे. महायुतीसाठी आम्ही एकत्र काम करू. जागा राष्ट्रवादीला सुटली तर आम्ही घड्याळावरच लढू. मी लढणार असल्याची बॅनर्स गावागावात लागली आहे. मला त्याची माहिती मिळाली, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

मराठा आरक्षणाला विरोध नाही

यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी मराठा समाजाला कधीच विरोध केला नाही. नेहमीच पाठिंबा दिला आहे. नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी पावलं उचलली. मी त्यांना पाठिंबा दिला. फक्त ओबीसीतून आरक्षण देऊ नका. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, एवढंच मी म्हणालो. बरं हे काही मी एकटा म्हणालो नव्हतो. सर्वच पक्षाच्या नेत्यांची हिच भूमिका होती. मी आरक्षणाला विरोध केला नाही, असंही ते म्हणाले. निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने होऊ द्यावी हेच माझं मराठा नेत्यांना सांगणं आहे, असंही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -