Tuesday, August 26, 2025
Homeराजकीय घडामोडीसुप्रिया सुळे, कोल्हे पहिल्या यादीत, कराळे गुरुजींना तिकीट नाहीच; शरद पवार गटाची...

सुप्रिया सुळे, कोल्हे पहिल्या यादीत, कराळे गुरुजींना तिकीट नाहीच; शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर

शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शरद पवार गटाने पाच जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. बारामतीतून सुप्रिया सुळे आणि शिरूरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वर्ध्यातून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिंडोरीतून भास्कर भगरे यांना तर नगरमधून निलेश लंके यांना तिकीट देण्यात आलं आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातून नितेश कराळे गुरुजी इच्छूक होते. त्यासाठी त्यांनी शरद पवार यांची तीन वेळा भेटही घेतली होती. पण त्यांना तिकीट देण्यात आलेलं नाही.ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -