Thursday, February 6, 2025
Homeक्रीडाजोरदार ट्रोलिंग आणि सलग 2 पराभवानंतर हार्दिक पंड्याचा मोठा निर्णय!

जोरदार ट्रोलिंग आणि सलग 2 पराभवानंतर हार्दिक पंड्याचा मोठा निर्णय!

 

प्रत्येक खेळाडूला त्याच्या कामगिरीमुळे टीका सहन करावी लागते. मात्र हार्दिक पंड्या याच्याबाबत बऱ्याच अंशी उलट झालंय. मुंबई इंडियन्स फ्रंचायजीने कॅप्टन बदलण्याचा निर्णय घेत रोहित शर्मा याच्याऐवजी हार्दिक पंड्या याला जबाबदारी दिली. आता रोहितला कर्णधारपदावरुन हटवल्याचा रोष हार्दिकला सहन करावा लागला. हार्दिकवर नेटकरी जोरदार बरसले. हार्दिकला नको नको त्या भाषेत वाटेल ते बोलले, छपरी, टपोरी आणि काय काय. या टीकेत भर पडली ती हार्दिकच्या कॅप्टन्सीत झालेल्या सलग 2 पराभवाची. त्यामुळे नेटकऱ्यांनी हार्दिकला धुवून काढला. अशात हार्दिकने मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.मुंबईने पहिले 2 सामने गुजरात आणि हैदराबाद विरुद्ध खेळले. त्यानंतर मुंबई आपला तिसरा आणि होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवरील पहिला सामना हा 1 एप्रिल रोजी खेळणार आहे. मुंबई टीम या सामन्यासाठी मुंबईत दाखल झाली आहे. मात्र या सामन्याआधी कॅप्टन हार्दिकने मोठा निर्णय घेतलाय. हार्दिकने या सामन्याआधी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतलाय. मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक आपल्या कुटुंबियांसह वेळ घालवणार आहे.

 

‘वन क्रिकेट’ च्या रिपोर्ट्सनुसार , हार्दिक मुंबई विमानतळावर पोहचताच आपल्या घरी निघून गेला. हार्दिक मुंबईतील घरी गेला आहे. हार्दिकवर होत असलेल्या टीकेनंतर आणि सलग 2 अपयशानंतर हार्दिकने काही तासांसाठी कुटुंबियांसह वेळ घालवण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार सुरु असतात. अशावेळेस कुटुंबियाची सोबत आणि त्यांचा पाठींबा ही संजीवनी ठरते. हार्दिकसाठी ही विश्रांती किती निर्णायक ठरते, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच.मुंबईचे सलग 2 पराभव

दरम्यान मुंबई आयपीएल्या 17 व्या मोसमातील आपल्या सलामीच्या सामन्यात 12 व्या वर्षीही विजय मिळवण्यात अपयशी ठरली. मुंबईने अखेरचा आपला सलामीचा सामना 2012 साली जिंकला होता. तेव्हापासून मुंबईला काही पहिला सामना जिंकता आलेला नाही. गुजरात टायटन्सने मुंबईला लोळवलं. तर त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादला जोरदार टक्कर दिली. मात्र मुंबई तिथेही अपयशी ठरली.

 

मुंबई इंडियन्स टीम | हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, विष्णू विनोद, शम्स मुलानी, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, नुवान तुषारा, देवाल्ड ब्रेविस, क्वेना मफाका आणि नमन धीर.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -