अभिनेते गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय करियरमुळे चर्चेत आहे. जवळपास दोन दशकाच्या राजकीय वनवासानंतर गोविंदा पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाक गोविंदा यांनी प्रवेश केला. प्रवेशानंतर गोविंदा निवडणूक लढवणार की नाहीत? अशी चर्चा रंगली होती. आता याबाबतीत मोठी माहिती समोर आली आहे. गोविंदा निवडणूक लढणार नसल्याची माहिती समोर येत आहे. फक्त शिंदे गटाच्या उमेदवारांचा प्रचार गोविंदा करणार आहेत.पहिल्या टप्प्यामध्ये उमेदवारांच्या होणाऱ्या मतदानासाठी गोविंदा विदर्भात प्रचार करतील. 4, 5, आणि 6 एप्रिलला गोविंदा रामटेकमध्ये प्रचार करतील. 11, 12 एप्रिलला गोविंदा यवतमाळ, त्यानंतर अभिनेते 15, 16 एप्रिलला हिंगोली याठिकाणी प्रचार करणार आहेत. 17 आणि 18 एप्रिलला गोविंदा बुलढाणा याठिकाणी गोविंदा प्रचार करणार आहेत.
सांगायचं झालं तर, मुंबईतून गोविंदा यांना लोकसभा तिकीट मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. पण आता गोविंदा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती समोर येत आहे. तर गोविंदा फक्त प्रचार करणार आहे. गोविंदा शिंदे गटाचे स्टार प्रचारक असतील असं देखील सांगण्यात येत आहे.गोविंदा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहेत. सिनेमांमध्ये काम करण बंद केल्यानंतर गोविंदा यांनी राजकारणात प्रवेश केला. 2004 साली गोविंद जायंट किलर ठरले होते. गोविंदा यांचे भाजपचे राम नाईक यांना पराभूत केले होते. पण त्यानंतर ते अचानक राजकारणापासून दूर गेले. आता पुन्हा राजकीय करियरमुळे गोविंदा चर्चेत आले आहेत.