वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत संक्रमण करून, शुभ आणि अशुभ योग तयार करीत असतो; ज्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होत असतो. त्यात आता धनाचा दाता शुक्र ३१ मार्चला म्हणजेच आज मीन राशीत प्रवेश करणार आहे; जिथे राहू ग्रह आधीपासूनच स्थित आहे.
अशा स्थितीत राहू आणि शुक्र या दोन ग्रहांच्या संयोगाने विपरीत राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल. पण, या अशा तीन राशी आहेत; ज्यांचे नशीब यामुळे अधिक चमकू शकते. तसेच त्यांच्या संपत्तीतही वाढ होऊ शकते. चला जाणून घेऊ या भाग्यशाली राशी कोणत्या ते…
कर्क
राहू आणि शुक्राचा संयोग कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. ते लक्षात घेतले, तर तुमच्या पद आणि उत्पन्नात झपाट्याने वाढ होऊ शकते. समाजात तुमचा मान-सन्मानही वाढू शकतो. देश-विदेशांत तुम्हाला प्रवासाच्या संधी निर्माण होऊ शकतात; तसेच या काळात तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तसेच विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ राहील. यावेळी तुम्ही कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवू शकता.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी राहू आणि शुक्राचा संयोग अनुकूल ठरू शकतो. या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी अनेक नवीन संधी निर्माण होऊ शकतात. याच संधींच्या जोरावर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करू शकाल. व्यवसायात अनेक नव्या ऑर्डर मिळू शकतात; ज्यामुळे चांगला फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना यावेळी कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तसेच त्यांना प्रमोशन मिळू शकते.
वृषभ
शुक्र आणि राहूचा संयोग वृषभ राशीसाठी शुभ ठरू शकतो. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच उत्पन्नाच्या नव्या संधी तयार होऊ शकतात. त्याचबरोबर व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराशीही चांगला समन्वय राहील. सुखी वैवाहिक जीवनामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. यावेळी तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होईल.