हणमंतवाडी (ता.करवीर) येथे दोन गटात बुधवारी रात्री (ipl match) आयपीएल सामन्यावरून तुंबळ हाणामारी झाली होती. टीव्हीवर आयपीएल क्रिकेटचा सामना बघत असताना, बुधवारी रात्री दहाच्या सुमारास बंडू तिबिले व बळवंत झांजगे यांच्यात चेष्टा मस्करी सुरू झाली आणि त्याचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले.
यावेळी बळवंत झांजगे व सागर झांजगे या चुलत्या- पुतण्यांनी लाकडी फळी व काठीचा वापर करत बंडोपंत बापू तिबिले यांना गंभीर जखमी केले होते (ipl match). त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना काल त्यांचा मृत्यू झाला. हणमंतवाडी येथे टीव्हीवर आयपीएल क्रिकेटचा सामना बघत असताना, बुधवारी (ता.२७) रात्री दहाच्या सुमारास बंडू तिबिले व बळवंत झांजगे यांच्यात चेष्टा मस्करी सुरू झाली आणि त्याचे रूपांतर बाहेर आल्यानंतर मोठ्या भांडणात झाले.बळवंत झांजगे व त्यांचा पुतण्या सागर झांजगे यांच्या मारहाणीने तिबिले गंभीर जखमी झाले होते. तिबिले यांच्या मागे पत्नी, तीन मुली, जावई, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान संशयित सागर झांजगे व बळवंत झांजगे यांना जिल्हा न्यायालयाकडून पोलिस कोठडी देण्यात आली आहे.