सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे (chicken). यामध्ये एका नवऱ्याने बायकोला खिडकीतून खाली फेकल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानमधील असल्याचं सांगितल जात आहे. या महिलेला तिच्या नवऱ्याने खाली फेकण्याचं कारण ऐकून धक्काच बसतो. झणझणीत चिकण बनवलं नाही म्हणून नवऱ्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे (chicken). या व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या घराच्या छतावरून खाली पडताना दिसत आहे. ही महिला मोठ्याने किंचाळत आहे.
ती जोरजोराने ओरडत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. ही महिला अचानक छतावरून खाली पडली आहे. तेव्हा घटनास्थळी उपस्थित असलेले लोकं तातडीने तिच्या मदतीसाठी पोहोचले आहे.दुखापत झाल्यामुळे ही महिला वेदनेने विव्हाळत आहे (chicken). काही लोकं तिला मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचतात अन् तिला उचलतात. व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने दावा केला आहे की, या महिलेला मसालेदार चिकन शिजवता येत नव्हतं, त्यामुळे पाकिस्तानी व्यक्ती संतापला.