Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्र'मी निवडणूक जिंकले, तर प्रत्येक गावात बिअर बार': कमी दरात व्हिसकी आणि...

‘मी निवडणूक जिंकले, तर प्रत्येक गावात बिअर बार’: कमी दरात व्हिसकी आणि बिअर उपलब्ध करुन देईन : महिला उमेदवार

निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार कुठलं आश्वासन देईल याचा नेम नसतो. काही उमेदवार निवडणूक जिंकण्यासाठी वाट्टेल ती आश्वासन देतात. त्यांना मर्यादेच भान राहत नाही. महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणूक 2024 चा प्रचार सुरु झाला आहे. या प्रचारादरम्यान एका महिला उमेदवाराने विचित्र आश्वासन दिलय, त्याची देशभरात चर्चा आहे. “मी निवडणूक जिंकली, तर कमी दरात लोकांना व्हिसकी आणि बिअर उपलब्ध करुन देईन” असं वनिता राऊत या उमेदवाराने म्हटलं आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढवत आहेत. त्या अखिल भारतीय मानवता पार्टीच्या सदस्य आहेत. वनिता राऊत अशा पद्धतीचा प्रचार करुन मद्यपानाला प्रोत्साहनच देण्याबरोबर प्रसिद्धी सुद्धा मिळवतायत.

“मी लोकसभेला निवडून आली, तर प्रत्येक गावात फक्त बिअर बार उघडणार, सोबत खासदार निधीतून परदेशी दारु आणि बिअर उपलब्ध करुन देईन” अस वनिता राऊत यांनी म्हटलं आहे. ‘जिथे गाव, तिथे बिअर बार’ असा प्रचार सध्या वनिता राऊत करत आहेत. रेशनिंगच्या माध्यमातून परदेशी दारु उपलब्ध करुन देईन. त्यासाठी पिणाऱ्यांना आणि विक्रेत्यांकडे परवाना आवश्यक असेल. वनिता राऊत आपल्या मुद्याचा समर्थन करताना सांगतात की, “खूप गरीब लोकांना दारु पिण्यामध्ये समाधान मिळत. पण त्यांचा उंची दारु, बिअर परवडत नाही. त्यांना देशी दारुवर समाधान मानाव लागत. मला त्यांना परदेशी दारुचा आनंद द्यायचा आहे”

2019 मध्ये काय आश्वासन दिलेलं?

वनिता राऊत यांची निवडणूक लढवण्याची ही पहिली वेळ नाहीय. 2019 साली त्यांनी नागपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवलेली. 2019 मध्येच चिमूरमधून विधानसभेची निवडणूक लढवलेली. 2019 च्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी हेच आश्वासन दिलं होतं. निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत डिपॉझिट जप्त झालं होतं. यावेळी सुद्धा त्या तसाच प्रचार करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -