Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा समाजासाठी खुशखबर! आजपासून मिळणार EBC प्रमाणपत्र, ‘या’ कागदपत्रांची करा पूर्तता

मराठा समाजासाठी खुशखबर! आजपासून मिळणार EBC प्रमाणपत्र, ‘या’ कागदपत्रांची करा पूर्तता

 

मागील अनेक दिवसापासून मराठा समाजात आरक्षणासाठी उपोषण चालू होते. अशातच आता या मराठी समाजातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता मराठा समाजाला ईबीसीचे प्रमाणपत्र (EBC Certificate) मिळणार आहे. म्हणजे त्यांना सामाजिकदृष्ट्या मागास घटक प्रमाणपत्र मिळणार आहे. सरकारने ऑनलाईन संकेतस्थळावर देखील ईबीसीचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे आजपासून म्हणजे सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 पासून मराठा तरुणांना हे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. परंतु यासाठी तहसीलदाराकडे उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेयर आणि त्यात जात प्रमाणपत्र या सगळ्या गोष्टींसाठी खूप जास्त कालावधी लागणार आहे. परंतु आता यावर जिल्हा प्रशासन काय मार्ग काढणार आहे यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे.सध्या राज्यामध्ये 17000 पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी अर्ज देखील मागवण्यात आलेले आहे. 15 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीमध्ये मराठा समाजातील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास तरुणांना आरक्षण दिले जाणार आहे. परंतु अजून ईबीसीचे प्रमाणपत्र मिळालेले नसल्याने ही पोलीस भरतीची अर्ज करण्याची मुदत देखील 30 ते 45 दिवस असल्याने आता अर्ज करणाऱ्यांना त्यांची पोचपावती चालणार आहे.

मराठा तरुणांना ईबीसीचे प्रमाणपत्र (EBC Certificate) मिळणार आहे. परंतु त्यांना हा दाखला वेळेत मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाला नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र सध्या बंद असून संपूर्ण मतदार आपले सरकार सेवा केंद्रावर आहे. त्यातही 400 केंद्र सध्या बंद आहेतत. त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर नोकर भरती व प्रशासकीय योजनेसाठी लागणारे लाभ लागणारे दाखले लाभार्थ्यांना लवकरात मिळावे अशी सगळ्यांची इच्छा आहे.

ईबीसीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (EBC Certificate)
अर्जदाराचे आधार कार्ड
मतदान कार्ड
अर्जदाराचा रहिवाशी दाखला
शाळा सोडल्याचा दाखला
अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन नातेवाईकांच्या शाळेचा दाखला
त्या दोन्ही नातेवाईकांचे आधार कार्ड आणि मतदान कार्ड
नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
अर्जदाराचे आधार कार्ड मतदार कार्ड
अर्जदाराचा रहिवासी दाखला
अर्जदाराचे जातीच्या दाखल्याचे प्रमाणपत्र
पालकांचे तहसीलचे तीन वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
आता सरकारच्या ऑनलाईन संकेतस्थळावर मराठा तरुणांना ईबीसीचे प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी तुम्हाला तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला देणे खूप गरजेचे आहे. त्यात त्यामुळे आता जातीचे प्रमाणपत्र त्यांना पाहिजे आहे. अशा तरुणांना काही दिवसातच हे दाखले मिळतील या दृष्टीने सध्या नियोजन चालू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -