Friday, November 22, 2024
Homeक्रीडाआयपीएल 2024 स्पर्धेदरम्यान घेतला जाणार मोठा निर्णय, बीसीसीआय फ्रेंचायसी मालकांसोबत करणार मीटिंग

आयपीएल 2024 स्पर्धेदरम्यान घेतला जाणार मोठा निर्णय, बीसीसीआय फ्रेंचायसी मालकांसोबत करणार मीटिंग

आयपीएल 2024 स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जारी झालं असून रोज ठरल्याप्रमाणे सामने होत आहेत. स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील निकालानंतर गुणतालिकेवर प्रभाव पडताना दिसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात प्लेऑफची लढाई आणखी चुरशीची होणार आहे. असं असताना बीसीसीआयने एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक 16 एप्रिलला अहमदाबादमध्ये होणार आहे. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या मेगा ऑक्शनच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयने आयपीएलच्या सर्व दहा मालकांना बैठकीचं निमंत्रण दिलं आहे. फ्रेंचायसी मालकांसोबत सीईओ आणि ऑपरेशनल टीमही येण्याची शक्यता आहे. या बैठकीत बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह आणि आयपीएल अध्यक्ष अरुण सिंह धूमल यांचा समावेश असेल. मात्र असं असलं तर बैठकीतील अजेंडा अजूनही स्पष्ट नाही.आयपीएलमध्ये प्रत्येक दोन वर्षानंतर मेगा ऑक्शन होतं. त्यामुळे आयपीएल 2025 मेगा ऑक्शनपूर्वी बैठकीचं आयोजन केलं आहे. दुसरीकडे, आयपीएल संघांची संघाची 10 वरून 12 होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसेच बैठकीत रिटेन खेळाडूंबाबतही चर्चा होऊ शकते. याबाबत मालकांची वेगवेगळी मतं आहेत. काही मालकांच्या मते रिटेनशची संख्या वाढवायला हवी. इतकंच काय तर रिटेन करणाऱ्या खेळाडूंची संख्या आठ असायला हवी असं काहिंचं म्हणणं आहे.

 

मेगा ऑक्शन 2025 पूर्वी टीम पर्स वाढवण्याची मागणीही ठेवली जाऊ शकते. मिनी ऑक्शनपूर्वी सर्व संघांचं पर्स 100 कोटी रुपयांचं केलं होतं. मात्र यावेळी ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, आयपीएल स्पर्धेत आणखी दोन टीम वाढल्यास खेळाडूंसाठीची चुरस आणखी वाढू शकते. ओव्हरसीज खेळाडूंसाठी जबरदस्त रस्सीखेच होऊ शकते. त्यामुळे दहा संघच ठेवणार की 12 संघ होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. केरळ आणि पुण्याचा संघ होता मात्र हे संघ सध्याच्या स्पर्धेत दिसत नाहीत.

आयपीएल 2024 स्पर्धेच्या शेड्युलनुसार एकूण 10 संघ आहेत. त्यात पाच पाच ते दोन गट पाडले आहेत. आपल्या गटातील संघासोबत दोनवेळा असे 8 सामने होतात. तर दुसऱ्या संघातील गटासोबत प्रत्येकी एक मॅच होते. तर एका संघासोबत ड्रॉच्या माध्यमातून डबल मॅच होते, असे सहा सामने होतात. गुणतालिकेत टॉप चार असलेले संघ प्लेऑफमध्ये खेळतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -