Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रएप्रिलच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज; GST संकलनात नवा रेकॉर्ड, सरकारच्या तिजोरीत जमा...

एप्रिलच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज; GST संकलनात नवा रेकॉर्ड, सरकारच्या तिजोरीत जमा झाले इतके कोटी

नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसोबतच सरकारी(gst) तिजोरीशी संबंधित आनंदाची बातमी आली आहे. एप्रिलच्या पहिल्या दिवशी जीएसटी संकलनाचे मोठे आकडे समोर आले आहेत. मार्च महिन्यात जीएसटी संकलन 1.78 लाख कोटी रुपये होते. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये त्यात 11 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

 

मासिक आधारावर विचार केला तर आतापर्यंतची ही दुसरी मोठी(gst) आकडेवारी आहे. 23-24 या आर्थिक वर्षात 20.14 लाख कोटी रुपये GST संकलन झालं आहे, जे 22-23 च्या तुलनेत 11.7 टक्के अधिक आहे.मार्च महिन्यातील रिफंडवरील निव्वळ जीएसटी महसूल 1.65 लाख कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात 18.4 टक्के वाढ झाली आहे. संपूर्ण आर्थिक वर्षातील मासिक आधारावर सरासरी GST संकलनाची गणना केली तर 2023-24 या आर्थिक वर्षात 1.68 लाख कोटी रुपये आहे, जे गेल्या आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये 1.5 लाख कोटी रुपये होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -