Saturday, July 27, 2024
Homeब्रेकिंगमोबाईल कंपनीने तयार केली इलेक्ट्रिक कार; मिळाल्या 90 हजार ऑर्डर 24 तासांत

मोबाईल कंपनीने तयार केली इलेक्ट्रिक कार; मिळाल्या 90 हजार ऑर्डर 24 तासांत

कमी किंमतीत जोरदार फीचर्ससह जगभरात लोकप्रिय असलेल्या चायनिज मोबाईल कंपनीने बाजारात धुराळा उडवून दिला. शिओमी ही कंपनी भारतीय बाजारात सुद्धा आहे. कंपनीने इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवली आहे. कंपनीच्या या कारवर ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत. अवघ्या एका दिवसांत कंपनीकडे ऑर्डरचा पाऊस पडला.

24 तासांच्या आतच जवळपास 90,000 कारच्या ऑर्डरची बुकिंग झाली. या घडामोडींमुळे कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. शिओमी ही चीनमधील 5वी सर्वात मोठी स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे. स्मार्टफोन बाजारात दबदबा तयार केल्यानंतर कंपनी आता ऑटोमोबाईल कंपनीत उतरली आहे.

Xiaomi च्या SUV मध्ये अनेक फीचर्स आहेत. यामध्ये सर्वात मोठे फीचर हे आहे की कार एकदा चार्ज केल्यावर 800 किलोमीटरपर्यंत धावते. इतकेच नाही तर 0-100 किलोमीटरचा वेग पकडण्यासाठी या कारला केवळ 2.78 सेकंदाचा वेळ लागतो. या कारविषयी जाणून घेऊयात इतर फीचर…

 

24 तासांत 90,000 कारची ऑर्डर

 

शिओमीने ही ईव्ही बाजारात दाखल करुन इलेक्ट्रिक कार बाजारात अनेक दिग्गज कंपन्यांना आव्हान दिले आहे. या कारवर ग्राहकांनी ताबडतोब भरवसा पण दाखविला. 24 तासांच्या आतच या कंपनीला 90,000 कारची ऑर्डर मिळाली. शिओमीने या इलेक्ट्रिक कारच्या मायलेजविषयी केलेल्या दाव्यामुळे ग्राहकांच्या या कारवर उड्या पडल्या आहेत.

 

एकदा ही कार चार्ज केली की 800 किलोमीटरपर्यंत धावत जाते. या कारची सर्वाधिक वेग ताशी 265 किलोमीटर असा आहे.

कारची Power 673 PS इतकी आहे. तर या कारचा टॉर्क 838 Nm इतका आहे.

Xiomi SUV 7 एक फोर डोअर EV सेडान कार आहे. कारची लांबी 4997 mm, रुंदी 1963 mm आणि इंची 1455 mm इतकी आहे.

या कारमध्ये सुरुवातीच्या व्हेरिएंटमध्ये 73.6 kwh ची बॅटरी तर टॉप व्हेरिएंटमध्ये 101kWh बॅटरी आहे.कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी

 

हाँगकाँग बाजारात शिओमी कॉर्पोरेशनच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली. या शेअरचा सध्याचा भाव 16.74 HKD इतका आहे. आज या शेअरमध्ये 9.91 टक्क्यांची उसळी दिसून आली. एका महिन्यात कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 25 टक्क्यांपेक्षा अधिकचा परतावा दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -