Saturday, July 27, 2024
Homeराजकीय घडामोडीनिवडणुकीआधी 2000 रुपयाच्या नोटेबद्दल महत्त्वाची अपडेट, समोर आली हैराण करणारी बाब

निवडणुकीआधी 2000 रुपयाच्या नोटेबद्दल महत्त्वाची अपडेट, समोर आली हैराण करणारी बाब

 

देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु झाला आहे. संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. एकाबाजूला प्रचाराने जोर पकडलेला असताना 2000 रुपयाच्या नोटेबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. ही अपडेट दुसऱ्या कोणी नाही, तर रिजर्व बँक ऑफ इंडियाने दिली आहे. या अपडेटमधून 8200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आकडा समोर आला आहे. मागच्यावर्षी मे महिन्यात 2000 रुपयाची नोट बंद करण्याची घोषणा झाली होती. सर्वांना बँकेत नोट डिपॉझिट करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता RBI कडून 2000 रुपयाच्या नोटेबद्दल काय अपडेट समोर आलीय, त्या बद्दल जाणून घेऊया.भारतीय रिजर्व बँक RBI ने सोमवारी सांगितलं की, 2000 रुपयाच्या 97.69 टक्के नोटा बँकेकडे परत आल्या आहेत. फक्त 8,202 कोटी रुपये मुल्याच्या 2000 रुपयांच्या नोटा लोकांकडे आहेत. आरबीआयने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयाच्या नोटा परत घेण्याची घोषणा केली होती. केंद्रीय बँकेने म्हटलय की, 19 मे रोजी चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटांच एकूण मुल्य 3.56 लाख कोटी होतं. 29 मार्च 2024 रोजी या नोटांच मुल्य घटून 8202 कोटी रुपये राहिलय. म्हणजेच 19 मे 2023 रोजी 2000 रुपयाच्या जितक्या नोटा चलनात होत्या, त्यातल्या 97.69 टक्के नोटा परत आल्या आहेत.

 

अजूनही तुम्ही इथे डिपॉजिट करु शकता नोटा

लोकांना 8 ऑक्टोबर 2023 पासून आरबीआयच्या 19 कार्यालयात नोट बदलण्याची किंवा बँक खात्यात जमा करण्याचा पर्याय प्रदान करण्यात आला आहे. नोट बदलणारी किंवा जमा करणारी 19 आरबीआय कार्यालय अहमदाबाद, बंगळुरु, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना आणि तिरुवनंतपुरम येथे आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये 1,000 रुपये आणि 500 रुपयाच्या बँक नोटा चलनातून हटवल्यानंतर 2000 रुपयाच्या बँक नोटा आणल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -