लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहे. तरी देखील यवतमाळ-वाशिममध्ये शिंदेंच्या शिवेसेने उमेदवार जाहीर केलेले नाहीत. तर विद्यमान खासदार भावना गवळी मुंबईत तळ ठोकून असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा भेट घेतली. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र निर्णय का होत नाही? असा सवाल सध्या केला जातोय. यवतमाळ-वाशिम मतदारसंघात भावना गवळी यांचा उमेदवारीवर दावा आहे.
मात्र संजय राठोड यांच्याही नावाची चर्चा आहे मात्र लोकसभा लढण्यास त्यांनी नकार दिल्याची माहिती मिळतेय. तर संजय राठोडांनी लढावं अशी शिंदे गटाच्या कोअर टीमची इच्छा आहे. सोमवारी रात्री भावना गवळींनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. त्यामुळे यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून भावना गवळी की संजय राठोड यांना तिकीट मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.