Monday, April 22, 2024
Homenewsसाहेब..माझी 2 एकर जमीन हाय, गांजाची लागवड करायला परवानगी द्या ! शेतकऱ्याचे...

साहेब..माझी 2 एकर जमीन हाय, गांजाची लागवड करायला परवानगी द्या ! शेतकऱ्याचे थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र


बदलते हवामान, शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव यामुळं सामान्य शेतकऱ्याची अवस्था किती बिकट झाली आहे हे काही वेगळं सांगायला नको. म्हणूनच या परिस्थितीने हताश झालेल्या एका शेतकऱ्याने चक्क जिल्हाधिकाऱ्यांना गांजाची शेती करण्याची परवानगी मागितली आहे. खरतर गांजाची शेती करणं हा गुन्हा आहे मात्र सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्याने नाईलाजाने गांजाची शेती करण्यासाठी परवानगी मागितली आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


गांजाची शेती करण्याबाबतचे हे अजब पत्र सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातल्या शिरापूर येथे राहणाऱ्या अनिल आबाजी पाटील या शेतकऱ्याने सोलापर जिल्हाधिकाऱ्यांना लिहले आहे. त्यांनी आपल्या पात्रात म्हंटले आहे की, ” मी शेतकरी असून कोणतेही पीक केलं तरी त्याला सरकारचा हमीभाव मिळत नसल्यामुळे शेती तोट्यात आहे. शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. मशागतीसाठी केलेला खर्च देखील मिळत नाही. तसेच एखाद्या साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला असता त्याचे देखील बिल लवकर मिळत नाही”. अशी व्यथा त्यांनी आपल्या पत्रात मांडली आहे.


याशिवाय त्यांनी पुढे म्हंटले आहे की, ” गांजला चांगला भाव असल्यामुळे मला माझ्या नमूद गटामध्ये दोन एकर गांजा लागवड करण्याची दिनांक 15 सप्टेंबर 2021 पर्यंत लेखी परवानगी द्यावी अन्यथा मी दिनांक 16 सप्टेंबर 2001 रोजी या दिवशी आपल्या प्रशासनाकडून परवानगी मिळाली असे गृहीत धरून मी लागवड सुरू करणार आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्यास आपले प्रशासन जबाबदार राहील ही नम्र विनंती” हे पत्र आता सोशल मीडियावर देखील व्हायरल झालं आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याच्या या पत्रावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -