Friday, August 8, 2025
Homeक्रीडाएका विजयानंतर मुंबई इंडियन्सची मोठी झेप, गुणतालिकेत आता या स्थानावर

एका विजयानंतर मुंबई इंडियन्सची मोठी झेप, गुणतालिकेत आता या स्थानावर

आयपीएल स्पर्धेत प्लेऑफची शर्यत खऱ्या अर्थाने सुरु झाली आहे. प्रत्येक सामन्यातील निकालानंतर गुणतालिकेवर फरक पडताना दिसून येत आहे. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला 29 धावांनी पराभूत केलं. यामुळे दोन गुणांची कमाई तर झाली वरून नेट रनरेटही सुधारला आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्याने नेट रनरेट खराब झाला होता. अखेल दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात यात सुधारणा करता आली.

मुंबई इंडियन्सने दोन गुण आणि -0.704 नेट रनरेटसह आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांना धोबीपछाड दिला आहे. बंगळुरु आणि दिल्लीच्या पारड्यात दोन गुण आहेत. पण मुंबईच्या तुलनेत त्यांचा नेट रनरेट खूपच खराब आहे. त्यामुळे आरसीबीचा संघ नवव्या आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ दहाव्या स्थानावर आहे..

दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा 33 धावांनी धुव्वा उडवला. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सला जबर फायदा झाला आहे. लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सला मागे टाकत तिसरं स्थान पटकावलं आहे. तर गुजरात टायटन्सला सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. 33 धावांनी पराभूत केल्याने लखनौला नेट रनरेटमध्ये फायदा, तर गुजरातला तोटा झाला आहे. टॉप चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी आता चुरशीची लढाई असणार आहे.

प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ होणार आहे. सोमवारी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यानंतर अव्वल स्थानाचं काय ते ठरणार आहे.राजस्थान रॉयल्स 8 गुण आणि 1.120 नेट रनरेटसह पहिल्या, कोलकाता नाईट रायडर्स 6 गुण आणि 2.518 नेट रनरेटसह दुसऱ्या, लखनौ सुपर जायंट्स 6 गुण आणि 0.775 नेट रनरेटसह तिसऱ्या, चेन्नई सुपर किंग्स 4 गुण आणि 0.517 नेट रनरेटसह चौथ्या, सनरायझर्स हैदराबाद 4 गुण आणि 0.409 नेट रनरेटसह पाचव्या, पंजाब किंग्स 4 गुण आणि -0.220 नेट रनरेटसह सहाव्या, गुजरात टायटन्स 4 गुण आणि -0.797 सातव्या, मुंबई इंडियन्स 2 गुण आणि -0.704 नेट रनरेटसह आठव्या, आरसीबी 2 गुण आणि -0.843 नेट रनरेटसह नवव्या आणि दिल्ली कॅपिटल्स 2 गुण आणि -1.370 नेट रनरेटसह दहाव्या स्थानावर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -