Thursday, May 16, 2024
Homeजरा हटकेझणझणीत, कोल्हापुरी स्टाईल ‘कटाची आमटी’; पुरणपोळीला देईल अधिक स्वाद, पाहा सोपी रेसिपी…

झणझणीत, कोल्हापुरी स्टाईल ‘कटाची आमटी’; पुरणपोळीला देईल अधिक स्वाद, पाहा सोपी रेसिपी…

आपल्या माणसांची साथनवं वर्षनवी सुरुवातअन् पंगतीला पुरणपोळीचा थाट…

 

यंदा गुढीपाडवा हा सण ९ एप्रिल २०२४ रोजी साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात मराठी नवं वर्षाची सुरुवात दारात रांगोळी, घराला तोरण तर घरोघरी गुढी उभारुन करण्यात येते. गुढीपाडव्याला प्रत्येक जण आपापल्या परीने गोड पदार्थ बनवतो. श्रीखंड पुरी, बासुंदी, तर काही ठिकाणी पुरणपोळी बनवण्यात येते. पण, ‘कटाच्या आमटी’शिवाय पुरणपोळी अपूर्णचं आहे. पुरणपोळी खाताना तोंडी लावण्यासाठी कटाची आमटी म्हणजेच पोळीचा सार बनवला जातो. पुरणपोळीसाठी आपण जी डाळ शिजवतो त्यातील जे पाणी उरते त्या पाण्यापासून ही कटाची आमटी तयार केली जाते. चला तर आज आपण कोल्हापुरी स्टाईल कटाची आमटी कशी बनवायची हे पाहू.

 

साहित्य –

 

चण्याची डाळ, पांढरे तीळ, खसखस, आलं, लसूण, जिरं, मोहरी, कडीपत्ता, मीठ, मसाला, हळद, पाणी.

कृती –

 

पाव किलो चण्याची डाळ घ्या त्यात दोन तांबे पाणी घाला.

एका भांड्यात चण्याची डाळ शिजवून घ्या.

डाळ शिजल्यानंतर थोडं पाणी राहील ते बाजूला काढून घ्या.

एका पॅनमध्ये पांढरे तीळ, खसखस, आलं, लसूण भाजून घ्या. नंतर हे पदार्थ मिक्सरमध्ये बारीक करून घेताना त्यात सुख किंवा ओलं खोबर, जिरं सुद्धा घाला.

नंतर फोडणी देण्यासाठी भांड्यात तेल घाला व जिरं, मोहरी, कडीपत्ता आणि वाटून घेतलेला मसाला, मीठ, मसाला, हळद त्यात घाला. त्यानंतर सर्व एकजीव करून घ्या.

नंतर डाळ शिजवून घेतल्यानंतर जे पाणी आपण बाजूला काढून घेतलं ते या मिश्रणात घाला व उकळी आल्यानंतर गॅस बंद करा.

अशाप्रकारे तुमची कोल्हापुरी स्पेशल ‘कटाची आमटी’ तयार.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -