Thursday, May 16, 2024
Homeमहाराष्ट्रया बँकांच्या एफडीवर होणार मोठी कमाई; 8 टक्क्यांहून अधिकचा घसघशीत रिटर्न

या बँकांच्या एफडीवर होणार मोठी कमाई; 8 टक्क्यांहून अधिकचा घसघशीत रिटर्न

भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग 7 व्या वेळी रेपो दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे ग्राहकांना मुदत ठेव योजनेवर अधिकचा परतावा मिळत राहिल. तर काही प्रमुख बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजनांवरील व्याजदर कायम ठेवला आहे.काही बँका ज्येष्ठ नागरिकांना 3 वर्षांच्या एफडीवर 8 टक्क्यांहून अधिकचा रिटर्न देत आहेत. यामध्ये डीसीबी बँक, ॲक्सिस बँक, आरबीएल, यस, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदासह इतर बँकांचा समावेश आहे.DCB Bank ज्येष्ठ नागरिकांना 26 ते 37 महिन्यांसाठी 8.1 टक्के तर RBL Bank 24-36 महिन्यासाठी एफडीवर 8 टक्के, Yes Bank 36 ते 60 महिन्यांसाठी 8 टक्के, Bandhan Bank 3-5 वर्षांसाठीच्या एफडीवर 7.75 टक्के व्याज देत आहे.Bank Of Baroda ज्येष्ठ नागिरकांना 2 ते 3 वर्षांकरीता 7.75 टक्के, IDFC Bank 2 ते 3 वर्षांसाठी 7.75 टक्के, इंडसइंड बँक दोन वर्षे 9 महिने आणि तीन वर्षे 3 महिन्यासाठी 7.75 टक्के, ॲक्सिस बँकेने 3-5 वर्षांच्या एफडीवर 7.6 टक्के व्याज देत आहे.Kotak Mahindra Bank ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांसाठी 7.6 टक्के व्याज, Punjab National Bank 2 ते 3 वर्षांकरीता 7.5 टक्के व्याज, HDFC Bank 2 वर्षे 11 महिने एक दिन ते 3 वर्षाकरीता 7.5 टक्के व्याज, ICICI Bank 2 ते 3 वर्षांकरीता 7.5 टक्के व्याज देतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -