Monday, February 24, 2025
Homeब्रेकिंगAI तर गेम चेंजर; न्यायालयात त्याचा वापर करणार का? काय म्हणाले सरन्यायाधीश

AI तर गेम चेंजर; न्यायालयात त्याचा वापर करणार का? काय म्हणाले सरन्यायाधीश

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मोठी क्रांती आणू शकते. हा आधुनिक तंत्रज्ञान गेम चेंजर असल्याचे मत सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी मांडले. एआयचा भारतीय न्याय व्यवस्थेत वापर केल्या जाऊ शकतो, असे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षांत एआयविषयी जवळपास प्रत्येक क्षेत्रात चर्चा सुरु आहे. एआय किती फायदेशीर आणि किती नुकसानकारक आहे, याची चर्चा सुरु आहे. याबाबत देशाचे सरन्यायाधीशांनी पण त्यांचे मत मांडले आहे.

काय म्हणाले चंद्रचूड…सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भारत आणि सिंगापूर न्यायीक परिषदेत तंत्रज्ञानाच्या वापरावर त्यांचे मत मांडले. त्यांनी एआयच्या आवश्यकतेवर पण भर दिला. न्यायीक प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि एआयचा वापर हा गेम चेंजर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्याचा काळ हा बदल स्वीकारण्याचा आहे, आपल्याला तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर कसा करता येईल हे बघावे लागेल, असे ते म्हणाले. त्यांनी एआयच्या वापरासंबंधी इशारा पण दिला आहे. या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर होता कामा नये, असा इशारा पण त्यांनी दिला.

 

एआयचा चुकीचा वापरसरन्यायाधीशांनी एआयच्या चुकीच्या वापरावर चिंता व्यक्त केली. या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर व्हायला नको, असे त्यांनी स्पष्ट केले. एआयमुळे श्रीमंत आणि गरिबांतील दरी अधिक रुंदावणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.

अनेक उच्च न्यायालयात AI चा वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले. एआयच्या मदतीने लाईव्ह ट्रान्स्क्रिप्शन सेवा देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही सेवा सध्या हिंदी भाषेसह अन्य 18 प्रादेशिक भाषामध्ये पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

अनेक कामात एआयचा मोठा उपयोग होऊ शकतो, असे ते म्हणाले. यामध्ये डॉक्युमेंट रिव्ह्यू, केस मॅनेजमेंट, शेड्युलिंग यांचा समावेश आहे. एआयच्या मदतीने प्रशासनाचे काम सुलभ होणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे पेपरवर्क कमी होईल. पैशांसह वेळेची बचत होईल. तर याचिकाकर्त्यांना जलद न्यायदानासाठी पण एआय मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -