ताजी बातमी ऑनलाइन टीम
परदेशी भाषा शिकवणाऱ्या एका शिक्षकाने दहा वर्षाच्या विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. दौलत नगर परिसरात हा घृणास्पद प्रकार घडला आहे. याप्रकरणी संशयित मौलवी तलहा शेख (वय २०, रा.यादवनगर) यास राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. – संशयित आरोपी हा परदेशी भाषा शिकवतो म्हणून त्याने काही मुलांना शिकवण्यासाठी बोलवले होते. पीडित दहा वर्षाचा मुलगा शेख यांच्याकडे शिकवणीसाठी जात होता. त्याच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन शेख याने या बालकाचे लैंगिक शोषण केले.
याबाबत कोणाला काही सांगू नकोस अन्यथा तुझी शिकवणी बंद करणार अशी धमकीही त्याने बालकास दिली होती. या बालकास शारीरिक त्रास होऊ लागल्यामुळे त्याने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने शहरात खळबळ माजली आहे.
कोल्हापूर शिक्षकाचा विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -