Sunday, May 19, 2024
Homeराजकीय घडामोडीपहिल्या 2 तासांत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान

पहिल्या 2 तासांत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान

भारती पवार यांचे मोठे विधान

जनतेचा विश्वास पुन्हा एकदा मोदीजींवर आहे, भारतातील एकही गाव असं नाही की जिथे आमच्या योजना पोहोचलेल्या नाही, भारती पवार

अरुणाचल प्रदेशमध्ये 15% मतदान

अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत 15% मतदान झाले. तसेच विधानसभा निवडणुकीत सकाळी 7 ते 10 या वेळेत 20% मतदान झाले. अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 50 आणि लोकसभेच्या 2 जागांसाठी मतदान होत आहे.

कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे मतदान

गडचिरोली कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी तालुक्यातील चिंतनपेठ येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदानाच्या दिवस आहे, सर्वांनी मतदान करावे असे आवाहन केले

मी चांगल्या फरकाने जिंकेन असा मला 101% विश्वास- नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री आणि नागपुरातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी म्हणाले, “आपण आज लोकशाहीचा सण साजरा करत आहोत. प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. हा आपला मूलभूत अधिकार आणि कर्तव्यही आहे. तुम्ही कोणालाही मत देऊ शकता, पण तुमचं मत देणं महत्त्वाचं आहे. मला 101% विश्वास आहे की मी चांगल्या फरकाने जिंकेन.”

पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात पहिल्या दोन तासात 7.28 टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सुरु झालं आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात पहिल्या दोन तासांत म्हणजे सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 7.28 टक्के मतदान झालं आहे.

 

पहिल्या टप्प्यातील एकूण 5 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी:

 

रामटेक- 5.82 टक्के नागपूर- 7.73 टक्के भंडारा- गोंदिया- 7.22 टक्के गडचिरोली- चिमूर 8.43 टक्के चंद्रपूर- 7.44 टक्के

सदगुरू जग्गी वासुदेव यांनी बजावला मतदानाचा हक्क

तामिळनाडू: कोईम्बतूर इथं लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सदगुरू जग्गी वासुदेव यांनी मतदान केलं. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.नितीन गडकरींचं नागपुरातील मतदारांना विशेष आवाहन

केंद्रीय मंत्री आणि नागपुरातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “आपण देशातील सर्वात मोठा सण अत्यंत उत्साहात साजरा करत आहोत. नागपुरात मी विशेषत: मतदारांना आवाहन करेन की इथं तापमान जास्त आहे, त्यामुळे त्यांनी लवकर मतदानासाठी यावं. गेल्या वेळी 54 टक्के मतदान झालं होतं. यावेळी मतदानाची टक्केवारी 75 टक्क्यांवर नेण्याचा आमचा संकल्प आहे.” नितीन गडकरी यांच्या विरोधात महाविकास आघाडीने काँग्रेस नेते विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क

नागपूर: महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी कोराडी ग्रामपंचायत कार्यालय मतदान केंद्रावर मतदान केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -