Sunday, September 8, 2024
Homeराजकीय घडामोडीताफा थांबवत अजितदादांची अपघातग्रस्ताला मदत, ताफ्यातील गाडीतून पाठवले रुग्णालयात

ताफा थांबवत अजितदादांची अपघातग्रस्ताला मदत, ताफ्यातील गाडीतून पाठवले रुग्णालयात

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या धडाकेबाज कामांमुळे ओळखले जातात. सकाळी सहा वाजता ते दौऱ्यावर असतात. मग एखादे काम न झाल्यास ते अधिकाऱ्यांना धारेवर धरतात. काम होणार नसले तर कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगतात. कोणाची मुलाहिजा न बाळगणारे अजित पवार तितकेच संवेदनशीलसुद्धा आहेत. शनिवारी एका घटनेनंतर ते पुन्हा स्पष्ट झाले.

बारामतीहून काटेवाडीकडे जात असताना वाटेत त्यांच्या गाडीचा अपघात झाला. तो अपघात पहिल्यानंतर क्षणात त्यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवला. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार खाली उतरले. त्यांनी जखमी झालेल्या मदत सुरु केली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी रुग्णालयात फोन करुन उपचाराबाबत सूचनाही दिल्या.

कसा झाला अपघात

सोनगाव येथील आनंदराव देवकाते पत्नी संगीतासह आपल्या कारमधून बारामतीहून सोनगावकडे निघाले होते. त्यावेळी रामभाऊ तावरे यांच्या दुचाकीची कारला धडक बसली. या अपघातानंतर तावरे खाली पडले. त्यावेळी त्या अपघातस्थळावरुन कन्हेरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार जात होते. त्यांनी आपली गाडी थांबवण्याच्या सूचना चालकाला दिल्या. ते स्वत: गाडीतून खाली उतरले. जखमी व्यक्तीला ताफ्यातील लोकांसोबत मदत करु लागले. जखमी व्यक्तीला पाहताच ते म्हणाले, हे तर रामभाऊ.

ताफ्यातील गाडीत बसवून पाठवले रुग्णालयात

अजित पवार यांनी तातडीने स्वत:च्या ताफ्यातील गाडीत रामभाऊ तावरे यांना बसवले. सोबत आपल्या काही लोकांना दवाखान्यात पाठवले. दवाखान्यात डॉक्टरांना सूचनाही दिल्या. या अपघातात तावरे यांच्या पायाला किरकोळ जखम झाली आहे. मात्र अशातही क्षणाचा विलंब न लावता अजित पवार यांनी स्वतः पुढे होत दाखवलेली ही तत्परता सर्वांना भावली. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना त्यांनी पुढील दौऱ्याकडे न पाहता मदत कार्य केले. तावरे यांना रुग्णालयात पाठवल्यावर त्यांच्या पत्नीला काळजीचे काही कारण नाही, असं सांगत दिलासा दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -