Monday, May 20, 2024
Homeब्रेकिंगक्या बात है!! 10 वी मध्ये अपयश आल्यास आता ‘नापासा’चा शिक्का बसणार...

क्या बात है!! 10 वी मध्ये अपयश आल्यास आता ‘नापासा’चा शिक्का बसणार नाही; करावे लागणार ‘हे’ काम

 

10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना आता (10 th Board Results 2024) निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. काही विद्यार्थी या निकालाबाबत उत्सुक आहेत तर काही विद्यार्थी निकलाबाबत चिंताग्रस्त आहेत. निकालामध्ये कोण उत्तीर्ण होणार तर कोण अनुत्तीर्ण होईल; याबाबत निकालादिवशीच स्पष्ट होईल. मात्र, आता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर नापासाचा शिक्का बसणार नाही. हे स्वप्नवत वाटत असले तरी हे सत्य आहे.

 

नापास विद्यार्थ्यांवर नापासाचा शिक्का बसणार नाही (10 th Board Results 2024)

दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जसजशी जवळ येईल तसे आता मुलांना निकालाचे टेन्शन आले आहे. निकालात कोणी पास तर कोणी नापास होईल. मात्र, आता नापास विद्यार्थ्यांवर नापासाचा शिक्का बसणार नाही. अशा विद्यार्थ्यांना सहा महिन्यांचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे; तसेच जुलैमध्ये पुरवणी परीक्षेच्या सहाय्याने त्यांना उत्तीर्ण होण्याची संधीदेखील मिळणार आहे.

 

शैक्षणिक वर्ष वाया न जाता कौशल्य प्रशिक्षण मिळणार

दहावी, बारावीच्या परीक्षेत विद्यार्थी नापास झाल्यास पुढील शिक्षणात या विद्यार्थ्यांना आवड राहत नाही. अनेकांना नापास झाल्यामुळे पुढे शिकण्याची इच्छा नसते. त्यामुळे नापास (10 th Board Results 2024) झालेल्या विद्यार्थी व पालकांचे शाळेतच समुपदेशन केले जाणार आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांना सहा महिने कालावधीचे रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थी दहावीच्या पुरवणी परीक्षेलादेखील बसू शकतील. याचदरम्यान एटीकेटीच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया न जाता त्यांना कौशल्याचे धडे घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

 

पालकांची भूमिका महत्त्वाची

दहावी, बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात येतो. त्यानंतर निकाल त्या-त्या केंद्रांवरून वितरित केला जातो. शाळा, महाविद्यालयांचा निकाल घेण्यासाठी आलेल्या (10 th Board Results 2024) शिक्षकांना बोर्डाच्या प्रतिनिधीकडून समुपदेशन केले जाणार आहे. त्यानंतर हे शिक्षक नापास विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणार आहेत.

विद्यार्थी नापास झाला की, पालक मुलांवर अपयशाचे खापर फोडतात; तर पास झाला तरी अनेक पालक मुलांना टक्केवारीच्या कोंडीत पकडले जाते. अशा परिस्थितीत पालकांनी विद्यार्थ्यांना सांभाळून घेण्याची गरज असते. त्यामुळे पाल्यांना सावरून त्यांना योग्य दिशा देणाची पालकांची तयारी असायला हवी.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -