Sunday, September 8, 2024
Homeक्रीडाहैदराबादचा पाचवा विजय, पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी झेप?

हैदराबादचा पाचवा विजय, पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी झेप?

 

पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिट्ल्सवर 67 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे. हैदराबादने दिल्लीसमोर विजयासाठी 267 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दिल्लीला या विजयी धावांचा पाठलाग करताना कडवी टक्करही देता आली नाही. इतकंच काय, तर दिल्लीला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. दिल्लीचं 19.1 ओव्हरमध्ये 199 धावावंर पॅकअप झालं. दिल्लीकडून जेक फ्रेझर-मॅकगर्क याने सर्वाधिक धावा केल्या. जेक फ्रेझर-मॅकगर्क याने 18 बॉलमध्ये 65 धावांची खेळी केली. कॅप्टन ऋषभ पंतने 35 बॉलमध्ये 44 धावा केल्या. तर अभिषेक पोरेलने 42 रन्स जोडल्या. या तिघांशिवाय इतरांना काही करता आलं नाही. तर हैदराबादकडून टी नटराजन याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मयंक मार्कंडे आणि नितीश रेड्डी या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदर आणि भुवनेश्वर कुमार या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

 

सनरायजर्स हैदराबादचा हा या मोसमातील पाचवा विजय ठरला. हैदराबाद आयपीएलच्या 17 व्या मोसमात 5 सामने जिंकणारी राजस्थान रॉयल्सनंतर दुसरी टीम ठरली. हैदराबादने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. हैदराबादने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर 2 गमावले आहेत. हैदराबादचा नेट रनरेट हा 0.914 असा आहे. हैदराबाद विजयी झाल्याने कोलकाताची तिसऱ्या आणि चेन्नईची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. तर दिल्ली पराभवानंतर सातव्या स्थानी फेकली गेली आहे. त्यामुळे मुंबई फायद्यासह सहाव्या स्थानी पोहचली आहे. मुंबई आणि दिल्लीने प्रत्येकी 3 सामने जिंकले आहेत. मात्र मुंबईचा नेट रनरेट दिल्लीपेक्षा चांगला असल्याने मुंबई सहाव्या क्रमांकावर पोहचली आहे.

 

दिल्ली प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद आणि मुकेश कुमार.

 

सनरायजर्स हैदराबाद प्लेईंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -