Saturday, July 27, 2024
Homeराजकीय घडामोडी2009 ची पुनरावृत्ती होणार अन्…; शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा

2009 ची पुनरावृत्ती होणार अन्…; शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा

 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी निवडणुकीवर भाष्य केलंय. तसंच विजयाचा विश्वासही संजय मंडलिक यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे. आमचा प्रचार आधीपासूनच सुरू झाला आहे. महापुरातील शिवसेनेच्या प्रथेनुसार कोटी तीर्थ स्वामी समर्थ मंदिरातून अधिकृतपणे प्रचाराला सुरुवात करत आहोत. उमेदवार माझा दिवसभर दौरा असेलच पण महायुतीचे सर्वच उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत. कोल्हापूर शहर हे हिंदुत्ववादी विचाराचं शहर आहे. 2009 ची पुनरावृत्ती होऊन अधिक ताकतीन शिवसेनेला शहरातून मते मिळतील, असं संजय मंडलिक यांनी म्हटलं आहे.

 

कोल्हापूर कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे आमचं इकडे विशेष लक्ष आहे. कालबाह्य विषयावर निवडणुकीत चर्चा व्हायला नको. स्वतःहून केलेली काही काम असतील तर त्यांनी सांगावेत मी अभिनंदनच करेन. सतेज पाटील यांना त्यांनी प्रवक्ता म्हणून नेमला आहे का? मला माहित नाही. तसं असेल तर त्यांना उत्तर माझे प्रवक्ते देतील, असं संजय मंडलिक म्हणालेत.

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीबद्दल आदरच आहे. पण निवडणुकीच्या रिंगणात टीका टिप्पणी होणार आहे. यांना लोकशाही हवी आहे की नाही कळत नाही. उमेदवारांनं काय केलं म्हणून माझ्यावर ट्रोलिंग केलं जातं. पण मी त्याला उत्तर देतोय. राजर्षी शाहू महाराजांनी केलेली काम मी केली असं म्हणण्यात अर्थ नाही. मग माझ्या वडिलांनी केलेली काम मी केली असं म्हणायचं का?, असा सवाल मंडलिक यांनी उपस्थित केला आहे.

मी या आधी निवडणुका लढवल्या आहेत मी सहकारांमध्येही काम करतोय. आजपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे नेते होते. आता मात्र कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला आहे. कोल्हापूरच्या अनेक संकटात एकनाथ शिंदे धावून आले आहेत. कार्यकर्त्याला ताकद द्यायची हा एकनाथ शिंदे यांचा स्वभावच आहे. मला कळत नाही उमेदवार सतेज पाटील आहेत की आणखी कोण आहेत. सतेज पाटील उमेदवार असते तर मी त्यांच्यावर बोललो असतो. आता महाराजांवर बोलतोय तर म्हणताय गादीचा अपमान होतोय, तर आम्ही काय करायचं आता राजेशाही शिल्लक राहिलेली नाहीयुतीच्या सर्वच पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांची मोट बांधली आहे. ही मोटच मला विजयापर्यंत नेईल, असं म्हणत सतेज पाटलांच्या टीकेला संजय मंडलिक यांनी उत्तर दिलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -