Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रछोटूरामची धमाल; आठ महिन्यातच 1450 टक्क्यांचा परतावा, गुंतवणूकदार मालामाल

छोटूरामची धमाल; आठ महिन्यातच 1450 टक्क्यांचा परतावा, गुंतवणूकदार मालामाल

 

बोंडाडा इंजिनिअरिंग (Bondada Engineering ) ही एक छोटी कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरने सध्या बाजारात धुमाकूळ घातला आहे. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 8 महिन्यात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 8 महिन्यात बोंडाडा इंजिनिअरिंगचा शेअर 1450 टक्क्यांहून अधिक वधारला. बोंडाडा इंजिनिअरिंगचा शेअर बुधवारी 24 एप्रिल रोजी 5 टक्क्यांच्या तेजीसह 1226.10 रुपयांवर पोहचला. कंपनीच्या शेअर्सने बुधवारी 52 आठवड्यातील नवीन उच्चांक गाठला. ही कंपनी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्टरशी संबंधित कामं करते. या कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांक 142.50 रुपये आहे.75 रुपयांहून 1200 रुपयांची भरारी

 

बोंडाडा इंजिनिअरिंगचा आयपीओ 75 रुपये किंमतीवर आला होता. कंपनीचा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी 18 ऑगस्ट 2023 रोजी उघडला होता आणि हा आयपीओ 22 ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला होता. कंपनीचा शेअर 30 ऑगस्ट 2023 रोजी 142.50 रुपयांवर सूचीबद्ध झाला. सूचीबद्ध झाल्यापासून कंपनीचा शेअर नवनवीन रेकॉर्ड करत आहे. कंपनीचा शेअर आज 24 एप्रिल रोजी 1226.10 रुपयांवर पोहचला. आयपीओ ते आतापर्यंत या कंपनीने गुंतवणूकदारांना 1450 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

6 महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये 400 टक्क्यांहून अधिक तेजी

 

Bondada Engineering चा शेअर गेल्या 6 महिन्यात 405 टक्क्यांनी उसळला. कंपनीचा शेअर 25 ऑक्टोबर 2023 रोजी 242.90 रुपयांवर होता. तर आज, 24 एप्रिल 2024 रोजी हा शेअर 1226.10 रुपयांवर पोहचला आहे. या वर्षभरात या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 194 टक्क्यांचा परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर या वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी 2024 रोजी 417.10 रुपयांवर व्यापार करत होता. आता तो 1200 रुपयांच्या पुढे पोहचला आहे.

 

8 रुपयांहून 1700 रुपयांची भरारी

 

KPI Green Energy च्या शेअरने गेल्या 4 वर्षांत मोठा पल्ला गाठला. कंपनीचा शेअर 17 एप्रिल 2020 रोजी 8 रुपये होता. तर कंपनीचा शेअर गुरुवारी 18 एप्रिल 2024 रोजी 1773.35 रुपयांवर होता. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 1895.95 रुपये इतका आहे. तर या शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांक 309 रुपये आहे.

 

एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 457 टक्के उसळी

 

स्मॉलकॅप कंपनी केपीआय ग्रीन एनर्जीचा शेअर गेल्या एका वर्षात 457 टक्क्यांनी उसळला. कंपनीचा शेअर 18 एप्रिल 2023 रोजी 318.77 रुपयांवर होता. तर या कंपनीचा शेअर आज 18 एप्रिल 2024 रोजी 1773.35 रुपयांवर आहे. गेल्या सहा महिन्यात सोलर कंपनीच्या शेअरमध्ये 207 टक्क्यांची जबरदस्त उसळी दिसून आली. एकाच वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 86 टक्क्यांची तेजी दिसून आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -