Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्ररेल्वेचे नाक दाबल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा; वेटिंग तिकीट रद्द केल्यावर नाही मोजावे...

रेल्वेचे नाक दाबल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा; वेटिंग तिकीट रद्द केल्यावर नाही मोजावे लागणार जादा पैसे

भारतीय रेल्वेला, तिकीट रद्द करण्याविषयीच्या शुल्कातून जोरदार कमाई होत होती. पण त्याचा प्रवाशांच्या खिशाला फटका बसत होता. त्यांना नुकसान सहन करावे लागत होते. एसी बोगीतील प्रवाशांना तर अधिक मनस्ताप होता. RTE अंतर्गत माहिती मागितल्यानंतर रेल्वेने तिकीट रद्द केल्यानंतरच्या कपातीचा नियम बदलवला. आता वेटिंग आणि RAC तिकीट रद्द करण्यासाठी रेल्वे स्वतंत्र शुल्क आकारणी करणार नाही. जर प्रवाशाचे तिकीट वेटिंग अथवा RAC मध्ये असेल तर त्याच्याकडून अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात येणार नाही.

कशी कापल्या जाईल रक्कम?

 

भारतीय रेल्वेच्या नवीन नियमानुसार, आता मात्र प्रवाशांकडून तिकीट रद्द करण्यासाठी 60 रुपये कापण्यात येतील. त्यामुळे स्लीपर क्लासमधील प्रवाशांना 120 रुपयांचे शुल्क, थर्ड एसी तिकीट कॅन्सल केल्यावर 180 रुपये शुल्क, सेंकड एसी तिकीट रद्द केल्यावर 200 रुपये आणि फर्स्ट एसी तिकीट रद्द झाल्यावर 240 रुपये शुल्क कपात करण्यात येईल. रेल्वेद्वारे पहिल्यांदा वेटिंग आणि आरएसी तिकीट वा इतर तिकीट रद्द केल्यावर सेवा कर आणि इतर शुल्क अशी मिळून तगडी वसुली करण्यात येत होती.

 

का घेतला हा निर्णय?

 

झारखंडमधील सामाजिक कार्यकर्ते सुनील कुमार खंडेलवाल यांनी अर्ज केला होता. त्यात शुल्क स्वरुपात किती रक्कम वसूल होते आणि किती रक्कम जमा होते, यावषयीची माहिती मागितली होती. माहिती मिळाल्यानंतर ,रेल्वे केवळ तिकीट रद्द केल्यानंतरच्या शुल्कातून बक्कळ कमाई करत असल्याचे आणि प्रवाशांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. एका प्रवाशाने 190 रुपयांचे तिकीट घेतले. कन्फर्म सीट मिळाले नव्हते. त्याने तिकीट रद्द केल्यावर त्याला केवळ 95 रुपये मिळाले.

 

पिण्याच्या पाण्याविषयी बदलला नियम

 

भारतीय रेल्वेने पाणी बचतीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. पिण्याच्या पाण्याची नासाडी त्यामुळे थांबणार आहे. वंदे भारत रेल्वेत आतापर्यंत प्रवाशांना एक लिटर पाण्याची बॉटल देण्यात येत होती. आता प्रत्येक प्रवाशाला 500 मिलीलीटरची, म्हणजे अर्धा लिटरची पिण्याच्या पाण्याची बॉटल, रेल्वे नीर पॅकेज्ड ड्रिकिंग वॉटर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी थांबेल. गरज पडल्यास प्रवाशी पाण्याची अतिरिक्त बॉटल मागवू शकतो. त्याला रेल्वे अर्धा लीटरची पाण्याची बॉटल देईल. त्यासाठी अतिरिक्त पैसे देण्याची गरज भासणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -