Friday, May 17, 2024
Homeब्रेकिंग24 तारखेला वरात आली, 25ला अंगावर अक्षता पडल्या अन् 26 तारखेला मृत्यू…अवघ्या...

24 तारखेला वरात आली, 25ला अंगावर अक्षता पडल्या अन् 26 तारखेला मृत्यू…अवघ्या तीन दिवसात तिचं आयुष्य

 

लग्नघरात शहनाईचे घुमणारे सूर, उत्साही वातावरण, नववधू आल्याने एकच आनंद होता. मात्र लग्नाच्या दोन दिवसांतच असं काही घडलं की जिथे हास्याचा आवाज होता, त्याच घरात शोककळा पसरली. नुकतंच लग्न झालेल्या तरूणाचा मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने कुटुंबियांना एकच धक्का बसला. हरियाणातील फरीदाबादमध्ये ही अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली. दोन दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला. अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप शोकाकुल नातेवाईकांनी लावला आहे. मात्र यामुळे त्या वधूच्या सर्व स्वप्नांची राखरांगोळी झाली असून तिच्या शोकाला पारावर उरला नाही. दोन दिवसांपूर्वी जेथे आनंदाचे वातावरण होतं, त्या लग्नघरात आता फक्त भयावह शांतता आहे. पोलिसांनी वराचा मृतदेह ताब्यात घेतला असून ते पुढील तपास करत आहेत.

नक्की काय झालं ?

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकास (28 वर्ष) असे मृताटे नाव असून 24 एप्रिल रोजी लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर अवघ्या तीन दिवसांतच त्याच्या मृत्यूने त्याच्या पत्नीचे आयुष्य उद्ध्वस्त झालं. मृताचा भाऊ नीरज यांने दिलेल्या माहितीनुसार, ते मूळचे उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील शिवाचली गावचे रहिवासी आहेत . त्याचा भाऊ विकास (28) हा एका खासगी शाळेत मुलांना इंग्रजी शिकवायचा आणि घरीही शिकवणी घ्यायचा.

विकासचा विवाह उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील पिलवा गावात राहणाऱ्या शिल्पासोबत झाला होता. 24 एप्रिल रोजी लग्नाची वरात मोठ्या थाटामाटात पार गेली पडली आणि 25 एप्रिल रोजी सप्तपदी घेऊन विकासने नववधूनसह घरी आला. 26 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता लग्नातील आणखी परंपरा पार पडली. आणि त्यानंतर रात्री 7:15 च्या सुमारास विकासच्या फोनवर कॉल आला. त्यानंतर आपण बाजारात जात असल्याचे सांगून विकास घराबाहेर पडला.

 

तो बाजार घरापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर बाजार होता. वाटेत गावातील एका मुलाने त्याला मोटारसायकलवरून लिफ्ट दिली. मात्र रात्री उशीर झाला तरी विकास घरी परतला नाही. कुटुंबियानी त्याला अनेक कॉल केले, पण त्याचा फोन बंद येत होता. अखेर घरचे त्याच्या शोधार्त बाहेर पडले. रात्री दहाच्या सुमारास ते पोलिस ठाण्यात पोहोचले पण तेथे कोणतीही सुनावणी झाली नाही. त्याच्या घरच्यांना हसन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यास सांगण्यात आले. मात्र पोलीस ठाणे आणि चौकीत कोणतीही सुनावणी झाली नाही. घरच्यांनी विकासच्या लोकेशन तपासले असता तो फोन दिल्लीत असल्याचे समजले. लोकेशन दिल्लीत आले.

 

फोन सतत ऑन-ऑफ होत राहिला

 

27 एप्रिल रोजी पहाटे 5:00 वाजता त्याचा फोन सुरू झाला आणि नंतर पुन्हा बंद झाला. त्यानंतर साडेसहाच्या सुमारास पुन्हा फोन आला आणि नंतर तो बंद झाला. त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास फरिदाबाद येथून एक फोनो आला. विकासने फरिदाबाद येथील नेकपूर येथे गळफास लावून घेतल्याचा फोन आला. त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तो फोन येताच घरचे फरीदाबादला पोहोचले असता, त्यांना समोर मुलाचा मृतदेह दिसला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. विकासचे कोणीतरी अपहरण केले असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला. अपहरण करणारी व्यक्ती बरीच हुशार असावी कारण त्याने तीन राज्य ओलांडली होती. उत्तर प्रदेशातून दिल्लीत आणि दिल्लीतून पुन्हा हरियाणामध्ये आणून त्याच्या भावाची हत्या करण्यात आली. विकासचे कोणाशीही वैर नव्हते, तरी त्याची हत्या कोणी केली असा प्रश्न कुटुंबियांना पडला. तरीही पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून हत्येचा खुलासा करावा, अशी कुटुंबियांची इच्छा आहे.

पोलिसांनी योग्य वेळी त्यांच्या भावाचे फोन लोकेशन शोधून काढले असते तर कदाचित त्यांच्या भावाची अशी हत्या झाली नसती, असे म्हणत मृत विकासच्या कुटुंबीयांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अवघ्या तीन दिवसांतच त्याच्या पत्नीचे, शिल्पाचे लग्न उद्ध्वस्त झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -