Saturday, May 18, 2024
Homeब्रेकिंगपतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदीचे हे आहे कारण, वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर

पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदीचे हे आहे कारण, वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर

 

रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण जवळपास एक महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात खेटा घालत आहेत. पतंजली आयुर्वेदच्या भ्रामक जाहिराती प्रकरणात सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर आज पुन्हा सुनावणी झाली. यावेळी योगगुरु रामदेव बाबा आणि पंतजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण हे सुनावणीवेळी कोर्टात हजर होते. न्यायालयाने दोघांना सुनवाणीला हजर राहण्यास सूट दिली. तर माफीनामा प्रसिद्ध केलेले वृत्तपत्र न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले.

 

14 उत्पादनांचा परवाना रद्द

 

यापूर्वी 23 एप्रिल रोजी सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने पतंजली आयुर्वेदद्वारे वृत्तपत्रात दिलेला माफीनाफा खारीज केला होता. माफीनामा त्याच आकारात छापण्यात यावा, ज्या आकारात जाहिरात छापण्यात आली आहे, असे न्यायालयाने निर्देश दिले होते. पतंजली आयुर्वेद लिमिटेड आणि दिव्य फार्मसीच्या 14 उत्पादनांचा परवाना उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणाने रद्द केला आहे.

ही आहेत ती उत्पादनं

 

उत्तराखंड औषधी विभागाने पतंजलीच्या 14 उत्पादनांचा परवाना रद्द केला आहे. त्यामध्ये स्वासारी गोल्ड, स्वासारी वटी, ब्रोंकोम, स्वासारी प्रवाही, स्वासारी अवलेह, मुक्त वटी एक्स्ट्रा पॉवर, लिपिडोम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर, लिवमृत ॲडव्हान्स, लिवोग्रिट, आईग्रिट गोल्ड, पतंजली दृष्टी आय ड्रॉप या औषधांचा समावेश आहे.

 

बाजारात मिळतील ही उत्पादनं

 

आता ही उत्पादनं बाजारात मिळणार नाही. पतंजली त्यांचे उत्पादन करु शकणार नाही आणि ही उत्पादनं विक्री पण करु शकणार नाही. या उत्पादनावर बंदी आल्याने ही उत्पादनं बाजारातून हटविण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -