ताजी बातमी /ऑनलाईन टीम
इचलकरंजी पासून जवळच असलेल्या शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे काल सोमवारी चालकाचा चार चाकी गाडी वरील ताबा सुटून भीषण अपघात घडला. या भागामध्ये एक ठार तर दहा जखमी झाले आहेत.
या अपघातामध्ये लालबी कुलबुर्गी या तारदाळ येथे राहणाऱ्या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला तर इतर चार महिलांना दुखापत झाली असून उर्वरित असणारी लहान मुले ही जखमी झाली आहेत. याची नोंद शहापूर पोलिसात झाली आहे.