Sunday, December 22, 2024
HomeBlogइचलकरंजी : पाणी उपसा बंद : घशाची कोरड आणखी वाढणार

इचलकरंजी : पाणी उपसा बंद : घशाची कोरड आणखी वाढणार

ताजी बातमी /ऑनलाईन टीम

काल सोमवारी दिवसभर वीज पुरवठा खंडित राहिल्यामुळे इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा आणि पंचगंगा नदीतील पाणी उपसा करता आला नाही. त्यामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

महावितरण कंपनीने देखभाल व दुरुस्तीसाठी काल सोमवारी काही भागातील विद्युत पुरवठा दिवसभर बंद ठेवला होता. त्यामुळे पाणी उपसाही झालेला नाही. त्यामुळे पुढील काही दिवस इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. दरम्यान सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर पुन्हा उपसा सुरू करण्यात आला आहे. याचबरोबर काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

आधीच शहरातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे आणि प्रचंड उन्हाळा यामुळे शहरवासीयांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असतानाच आता या कारणामुळे आणखी त्यात भर पडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -