Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगमधुमेह हृदय आणि यकृताच्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी 41 औषधे होणार स्वस्त ! 

मधुमेह हृदय आणि यकृताच्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी 41 औषधे होणार स्वस्त ! 

केंद्र सरकारने जनतेला दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. 41 आजारांच्या औषधांच्या किमती कमी केल्या जाणार आहेत. मधुमेह, हृदय आणि यकृताशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्यांसाठी हा दिलासा आहे.

सरकारने 6 आजारांसाठी फॉर्म्युलेशनच्या किमतीही निश्चित केल्या आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय जनतेला मोठा दिलासा मानला जात आहे. हृदय व इतर आजारांबाबत या औषधांच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी यापूर्वीही करण्यात आली होती. शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये त्यांनी मनमानी दर आकारल्याचे अनेकदा उघडकीस आले होते.

 

नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) आणि फार्मास्युटिकल्स विभागाने या निर्णयाबाबत अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये अँटिबायोटिक्स, मल्टीव्हिटामिन्स आणि अँटासिड्सशी संबंधित औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्णयानुसार औषध कंपन्यांनी त्यांच्या स्टॉकिस्ट आणि डीलर्सना औषधांच्या कमी झालेल्या किमतींची माहिती तातडीने देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. NPPA ची 143 वी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी कराव्यात, जेणेकरून सर्वसामान्यांना दिलासा मिळावा, असा निर्णय घेण्यात आला.

भारतात 10 कोटी लोक मधुमेहग्रस्त –

 

एका अंदाजानुसार, भारतात सध्या 10 कोटी लोक मधुमेहासारख्या आजारांना तोंड देत आहेत. जगभरातील देशांमध्ये भारतीय प्रथम क्रमांकावर आहे. औषधांच्या किमती कमी झाल्याचा थेट फायदा त्यांना मिळणार आहे. गेल्या महिन्यात, फार्मास्युटिकल्स विभागाला 923 शेड्यूल्ड औषधांच्या फॉर्म्युलेशनसाठी वार्षिक सुधारित किमती जाहीर करण्यास सांगण्यात आले होते. त्याच वेळी, विभागाने 65 फॉर्म्युलेशनसाठी सुधारित किरकोळ किमती जारी करण्याबद्दल सांगितले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -