Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रमान्सूनचे तारीख जाहीर ; यंदा पावसाळा कसा असेल ?

मान्सूनचे तारीख जाहीर ; यंदा पावसाळा कसा असेल ?

भारतात उन्हाच्या काहिलीतून सुटका व्हावी, म्हणून सगळे मान्सूनची आतुरतेेनं वाट पाहतात.

यंदा मान्सून भारताच्या मुख्य भूमीवर कधी दाखल होऊ शकतो, हे भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं आहे.

31 मे रोजी केरळमध्ये म्हणजे मान्सून दाखल होऊ शकतो, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. यात ± 4 दिवस, म्हणजे चार दिवस पुढे मागे होऊ शकतं असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे.

 

त्याआधी 19 मेच्या आसपास (± 4 दिवस) मान्सून अंदमान समुद्रात दाखल होईल असं भाकित हवामान विभागानं वर्तवलं होतं.

 

मान्सूनचं वेळापत्रक कसं असतं, कशामुळे त्याची निर्मिती होते आणि यंदाचा मान्सून कसा असेल, जाणून घेऊयात.

 

मान्सून हा शब्द कुठून आला?

 

काही भाषातज्ज्ञांच्या मते, मान्सून या शब्दाचं मूळ अरबी भाषेतल्या मौसीम या शब्दात आहे. मौसीम म्हणजे मोसमी वारे किंवा ऋतूनुसार वाहणारे वारे.

 

दक्षिण आशियात ठराविक काळात मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. इतका की त्या काळाला पावसाळ्याचा ऋतू म्हणून इथे स्वतंत्र ओळख मिळाली आहे.

 

याच मोसमी वाऱ्यांसाठी मान्सून हा शब्द ब्रिटिशकालीन भारतात वापरला जाऊ लागला.

 

मान्सूनचे दोन प्रकार कोणते?

 

भारतात जून ते सप्टेंबर या काळात वारे नैऋत्य दिशेकडून म्हणजे साधारण अरबी समुद्राकडून हिमालयाकडे वाहतात. या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे किंवा नैऋत्य मान्सून (साऊथ-वेस्ट मान्सून) म्हणून ओळखतात.

 

तर ऑक्टोबर महिन्यात वारे याच्या उलट दिशेने म्हणजे ईशान्येकडून वाहतात. त्यांना ईशान्य मोसमी वारे किंवा ईशान्य मान्सून (नॉर्थ वेस्ट मान्सून) म्हणतात. या वाऱ्यांमुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात प्रामुख्यानं दक्षिण भारतात पाऊस पडतो.

मान्सून कुठे तयार होतो?

 

मान्सूनची निर्मिती कशामुळे होते, याविषयी काही सिद्धांत आहेत.

 

पृथ्वी 21 अंशांमध्ये कलली आहे. त्यामुळे तिचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेला असतो. परिणामी उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो, तेव्हा दक्षिण गोलार्धात थंडी असते.

 

जास्त तापमान असतं तिथे हवेचा दाब कमी तर कमी तापमानाच्या ठिकाणी हवेचा दाब जास्त असतो. वारे नेहमी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात.

 

जमिनीपेक्षा समुद्राचं तापमान थोडं थंड असतं, त्यावेळी समुद्राकडून वारे वाहू लागतात. येताना हे वारे समुद्रावरचं बाष्प आणतात, त्यातून पाऊस पडतो.

 

पण हे असं चित्र पृथ्वीच्या इतर अनेक ठिकाणी होतं. मात्र भारतीय उपखंडातली स्थिती थोडी खास बनवते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -