Friday, June 21, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर-हातकणंगलेचा निकाल केव्हा येणार? निकाल कधीपर्यंत लागणार?

कोल्हापूर-हातकणंगलेचा निकाल केव्हा येणार? निकाल कधीपर्यंत लागणार?

महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे(kolhapur) मतदान 20 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी देशातील लोकसभेचा निकाल स्पष्ट होणार आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले सह 11 लोकसभा मतदारसंघातील मतदान तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी पार पडले. दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्ते नेते आणि पदाधिकाऱ्यांना आता निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. प्रशासनाकडून मतमोजणीच्या तयारीला सुरवात झाली आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात होणार असून दुपारी तीनवाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याचा अंदाज आहे.

 

मतमोजणीसाठी कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघासाठी(kolhapur) जवळपास 504 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकूण 142 व 127 फेऱ्यात निकाल पूर्ण होणार आहे.

 

 

कोल्हापूर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी 252 व हातकणंगलेसाठी 252 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तर कोल्हापूर लोकसभेसाठी मतमोजणी रमणमाळा येथील शासकीय गोदामात तर हातकणंगले लोकसभा निवडणुकीची मोजणी राजाराम तलाव येथे करण्याचे नियोजन आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीच्या फेऱ्या

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ

 

 

चंदगड – 27

 

राधानगरी – 30

 

कागल – 25

 

कोल्हापूर दक्षिण – 23

 

करवीर – 25

 

कोल्हापूर उत्तर – 22

 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ

शाहूवाडी- 23

 

हातकणंगले- 23

 

शिरोळ- 20

 

इचलकरंजी-18

 

शिराळा-23

 

इस्लामपूर-20

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -