Thursday, February 6, 2025
Homeब्रेकिंगएका झटक्यात गुंतवणूकदारांनी कमावले 3 लाख; 48 रुपयांचा शेअर 147 रुपयांवर

एका झटक्यात गुंतवणूकदारांनी कमावले 3 लाख; 48 रुपयांचा शेअर 147 रुपयांवर

शेअर बाजारात आणखी एक कंपनी सूचीबद्ध झाला. हा शेअर बाजारात येताच गुंतवणूकदारांनी भांगडा केला. त्यांना पहिल्याच दिवशी जबरदस्त फायदा झाला. हरिओम आटा हा ब्रँड बाजारात लोकप्रिय आहे. या ब्रँडची एचओएसी फुड्स लिमिटेड (HOAC Foods India Limited) ही मुळ कंपनी आहे. हा शेअर 206 टक्क्यांनी सूचीबद्ध झाला.

कंपनीचा शेअर 147 रुपयांवर सूचीबद्ध झाला. या शेअरचा प्राईस ब्रँड 48 रुपये प्रति शेअर होता. पहिल्याच दिवशी हरिओम आटा शेअरने गुंतवणूकदारांना तिप्पट परतावा दिला. 16 मे 2024 रोजी कंपनीचा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी बाजारात दाखल झाला होता. 48 रुपयांचा शेअर 147 रुपयांवर पोहचला.

गुंतवणूकदारांना बम्पर कमाई

 

गुंतवणूकदारांना 3000 शेअरचा लॉट खरेदी करायचा होता. हा लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना 1,44,000 रुपये खर्च आला. ज्या गुंतवणूकदारांनी एक लॉट खरेदी केला. त्यांना आता 2,96,640 रुपयांची लॉटरी लागली आहे. त्यासाठी एकूण गुंतवणूक 4 लाख 40 हजार 640 रुपये झाली असेल.

एचओएसी फुड्स इंडिया लिमिटेडचा शेअर सूचीबद्ध झाल्यानंतर घसरला. कंपनीचे शेअर 5 टक्क्यांनी घसरले. शेअरची किंमत 147 रुपयांहून घसरुन 139.65 रुपयांवर आला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज SME प्लॅटफॉर्मवर हा शेअर लिस्ट झाला.

काय करते ही कंपनी?

हरिओम नावाने ही कंपनी पीठ, डाळी, मोहरीचे तेल, मसाले आणि इतर अन्नपदार्थांची विक्री करते. HOAC Foods India मध्ये आयपीओ बाजारात दाखल होण्यापूर्वी प्रमोटर्सची भागीदारी 99.99 टक्के होता. बाजारात हा शेअर सूचीबद्ध होताच हा वाटा 69.95 टक्क्यांवर आला. उत्तर भारतात या कंपनीचे आऊटलेट्स पण आहेत. या कंपनीने बाजारात येताच धमाका केला. गुंतवणूकदारांना तिप्पट परतावा दिला. एकाच दिवसात गुंतवणूकदार मालामाल झाले. त्यांना तिप्पट रिटर्न मिळाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -