ताजी बातमी /ऑनलाइन टीम
इचलकरंजी पासून जवळच असलेल्या शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी कर्नाटक राज्यात राजापूर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू अशा पद्धतीच्या काही बातम्या कर्नाटक मीडियाच्या विविध माध्यमातून प्रसारित होत होत्या. मात्र सध्या राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकला अधिकृत रित्या एक थेंबही विसर्ग सुरू नाही. मग हा निसर्ग सुरू झाला कसा?
याबाबत मिळालेल्या माहितीवरून असे समजते की राजापूर बंधारा हा महाराष्ट्रातील शेवटचा बंधारा आहे आणि तेथे सध्या पाणी वाढवण्यात आले आहे परिणामी कर्नाटकात उन्हाळा असल्याने पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
यामुळे कर्नाटकात पाणी वाहून जाण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी बेकायदेशीररित्या मध्यरात्री बंधाऱ्याच्या वरील बाजूचे वर्गी काढून नदीमध्ये टाकून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता परिणामी यामुळे विसर्ग बंद असताना देखील येथील नदीची पाणी पातळी खालावली होती.
हे पाणी पुन्हा अडविले असता पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी 24 तास पोलीस बंदोबस्त गस्त म्हणून ठेवण्यात आला आहे.