कधी कोणाची कशी वेळ येईल काहीही सांगता येत नाही. कोणाचं कधी आणि कसं निधन होईल हे देखील सांगता येत नाही. काही घटना अशा असतात ज्या काळीज पिळवटून टाकणाऱ्या असतात. आता देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. घटना माहिती पडल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसेल. एका प्रसिद्ध अभिनेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. वयाच्या 37 व्या वर्षी अभिनेत्याची हत्या करण्यात आली. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. ज्या अभिनेत्याची हत्या करण्यात आली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाहीतर, हॉलिवूड अभिनेता जॉनी वेक्टर होता. जॉनी वेक्टर याने वयाच्या 37 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.
जॉनी वेक्टर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधीत घटना शनिवारी सकाळी घडली आहे. जॉनी वेक्टर याने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्याच्या मृत्यूची अधिकृत माहिती जॉनी वेक्टर याच्या आईने दिली आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
रिपोर्टनुसार, अभिनेता मित्रांसोबत फिरण्यासाठी शनिवारी मध्यरात्री 3 वाजता फिरायला निघाला होता. दरम्यान, अभिनेत्याच्या एका मित्राचं लक्ष त्याच्या कारकडे गेलं. कार जवळ तीन अज्ञात व्यक्ती उपस्थित होत्या. आरोपी अभिनेत्याच्या कारमधून कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरण्याचा प्रयत्न करत होते. याच दरम्यान अभिनेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
याप्रकरणी अभिनेत्याच्या आईने मोठी माहिती दिली आहे. चोरांना ओळखल्यानंतर अभिनेत्याने कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही. अखेर त्याची हत्या करण्यात आली. अभिनेत्यावर गोळ्या झाडल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. पण अद्याप एकही व्यक्ती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
अभिनेता जॉनी वेक्टर याच्या निधनानंतर हॉलिवूड आणि चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. अनेक चाहते आणि सेलिब्रिटी अभिनेत्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेता जॉनी वेक्टर याने ‘सायबेरिया एंडस क्रिमिनल माइंड्स’, ‘आर्मी वाइव्स’, ‘द ओए’, ‘हॉलीवुड गर्ल’ आणि ‘द वेस्टवर्ल्ड’ यांसारख्या प्रोजेक्टमध्ये काम केलं होतं. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या हत्येची चर्चा सुरु आहे…