महानगरपालिका आरोग्य विभागाकडील वॉर्ड इन्स्पेक्टर उमेश गजानन भोसले (वय ५४ रा. भाग्यश्री कॉलनी) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी स्वप्निल संजय सुसवरे (वय ३१ रा. कुडचे मळा) याने गावभाग पोलिसात फिर्याद दिली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, भाग्यश्री कॉलनी येथे वास्तव्यास असलेले उमेश भोसले हे महानगरपालिकेत वॉर्ड इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. २७ मे रोजी पहाटेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी छताच्या पंख्याच्या तुळीस नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.