Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रइंग्रजीपेक्षा मराठी कठीण, दहावी बोर्डाच्या परीक्षेत मराठी विषयात किती हजार विद्यार्थी नापास?

इंग्रजीपेक्षा मराठी कठीण, दहावी बोर्डाच्या परीक्षेत मराठी विषयात किती हजार विद्यार्थी नापास?

भविष्यातील शैक्षणिक वाटचालीच्या दृष्टीने 10 वी च वर्ष खूप महत्त्वाच मानलं जातं. याच इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यंदा राज्याचा निकाल 95. 81 टक्के इतका लागला. इंग्रजी भाषेपेक्षा मराठीत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सहापटीने जास्त आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च 2024 मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीच्या दृष्टीने 10 वी च वर्ष खूप महत्त्वाच मानलं जातं. त्यामुळे शाळा, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून दहावीच्या परीक्षेसाठी कसून तयारी केली जाते. याच इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यंदा राज्याचा निकाल 95. 81 टक्के इतका लागला. यावर्षी 14 लाख 84 हजार 441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाचा आकडा पाहता अनुर्त्तीण होणाऱ्या विद्यार्थ्यांच प्रमाण तसं कमी आहे. खासकरुन दहावी बोर्डाच्या परीक्षेत मराठी विषयात राज्यभरातून 38 हजार 437 विद्यार्थी नापास झालेत.

 

इंग्रजी भाषेपेक्षा मराठीत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सहापटीने जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या परीक्षेसाठी 11 लाख 3 हजार 307 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मराठी विषयाची परीक्षा देणाऱ्या 10 लाख 94 हजार 152 विद्यार्थ्यांपैकी 10 लाख 55 हजार 715 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मराठी भाषा विषयाचा निकाल 96.49 टक्के लागला.

 

मुंबईत नापास होण्याच प्रमाण जास्त

 

राज्यात मुंबईत मराठी विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त 4 हजार 670 इतकी आहे. मुंबईत 1 लाख 6 हजार 256 विद्यार्थ्यांनी मराठीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात 1लाख 5 हजार 322 विद्यार्थी परीक्षा केंद्रावर हजर राहीले. त्यापैकी 1 लाख 652 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इंग्रजी भाषेपेक्षा मराठीत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सहापटीने जास्त आहे. दहावीच्या परीक्षेत मुलींचा निकाल 97.21 टक्के इतका लागला. या परीक्षेतील 72 विषयांपैकी 18 विषयांचा निकाल 100 टक्के लागला, म्हणजेच 18 विषयांमध्ये मुलांना पैकीच्या पैकी गुण मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -